शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Paris Olympic 2024 : अखेर गाठलं 'लक्ष्य'! जोरदार कमबॅक करत Lakshya Sen विजयी; देसाईही जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 20:26 IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे.

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनने साखळी फेरीत विजय नोंदवत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला संघर्ष करत असलेल्या सेनने अखेर लक्ष्य गाठत विजयाला गवसणी घातली.  पहिला गेम लक्ष्यने सहज जिंकला होता, मात्र दुसऱ्या गेममध्ये थोडा संघर्ष करावा लागला. भारताच्या शिलेदाराने लक्ष्य गाठताना ग्वाटेमालाच्या केविन गॉर्डनचा २१-८, २२-२० असा पराभव केला. कॉर्डन मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीचा खेळाडू राहिला आहे. याशिवाय टेबल टेनिसमध्ये भारताच्या हरमीत देसाईची कामगिरी उत्कृष्ट राहिली. हरमीत देसाईने जॉर्डनच्या झायेद अमानचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.

टेबल टेनिसच्या प्राथमिक फेरीत देसाईने जॉर्डनच्या खेळाडूचा सहज पराभव करताना ४-० असा विजय नोंदवला. पण, पुढील फेरीत त्याच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्याचा सामना मायदेशात खेळत असलेल्या फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुनसोबत होणार आहे. त्यामुळे फ्रान्सच्या या नामांकित खेळाडूला भारतीय शिलेदार पराभवाची धूळ चारतो का हे पाहण्याजोगे असेल.

मनू भाकर फायनलमध्ये

ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. खरे तर भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.

मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सातत्य दाखवत तिने नेमबाजी करताना तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवानच्या पदरी निराशा पडली अन् तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadmintonIndiaभारत