पारधी वस्तीवर मिळू लागले अक्षरज्ञान शिक्षकांचा पुढाकार: पारंपरिक बदनामीतून बाहेर पडण्यासाठी धडपड
By Admin | Updated: February 10, 2015 00:55 IST2015-02-10T00:55:57+5:302015-02-10T00:55:57+5:30
हिसरे :

पारधी वस्तीवर मिळू लागले अक्षरज्ञान शिक्षकांचा पुढाकार: पारंपरिक बदनामीतून बाहेर पडण्यासाठी धडपड
ह सरे : पारधी समाजातील गुन्हेगारीला छेद देण्यासाठी याच समाजातील दोन शिक्षकांनी पुढाकार घेतला असून, हिसरे (ता. करमाळा) येथील हरी गोपीनाथ काळे व संतोष शंकर काळे यांनी आपल्याच वस्तीवर असलेल्या आबालवृद्धांसह बालकांना अक्षरज्ञान देत आहेत. याला नवयुवकांचीही साथ मिळत असल्याने ज्ञानदानाचा प्रकाश या वस्तीवर पडत आहे. पारधी समाजाचे निघताच सगळ्यांच्या मनात वेगळाच विचार निर्माण होतो. माणसासारखीच माणसं, पण पूर्वजांनी केलेल्या कलंकित कामगिरीमुळे आजही हा समाज बदनाम होऊ पाहत आहे. याला छेद देण्याचे काम खडतर परिस्थितीतही जिद्द, चिकाटीच्या बळावर हरी गोपीनाथ काळे व संतोष शंकर काळे या दोघांनी शिक्षण घेतले. स्वत: शिक्षित झाले आणि नोकरीही लागली म्हणून त्यांनी समाजाला वार्यावर न सोडता या समाजाची कुळे उद्धारण्यासाठी या दोघा शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना शिक्षित करण्याचा वसा घेतला आहे. अक्षरज्ञान देण्यासाठी धडपडणार्या शिक्षकांना नवयुवक विद्यार्थी राधा काळे, राजाभाऊ काळे, माधुरी भोसले, दिलीप काळे, नेहा काळे, रवी भोसले, नाना काळे, राहुल काळे, महेंद्र काळे त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यात हातभार लावत आहेत. केवळ शिक्षणाचे धडे न देता या समाजाला आपल्या हक्कांची व अधिकारांचीही जाणीव करून देण्यात येत असल्याने आतापर्यंत गुन्हेगारीच्या बेड्यात अडकून राहिलेला हा समाज आज सुशिक्षित तर होतच आहे, त्याचबरोबर आपल्या हक्कांसाठी लढा द्यायची भाषा करीत आहे.कोट:::::::::::::समाजावरील गुन्हेगारीचा कलंक पुसला पाहिजे. समाजाची प्रगती झाली पाहिजे. ही भावना होतीच, पण हक्कांची आणि अधिकारांची जाणीव करून देणारे शिक्षण हे एक माध्यम आहे. या माध्यमातून वस्तीवरील समाजाला आम्ही अक्षरज्ञान देत आहोत. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्ञानदानाच्या या कामात नवयुवक व युवतीही सहभागी होत आहेत.हरी काळे, संतोष काळेशिक्षककोट::::::::::::::::हिसरे येथील पारधी समाजातील शिक्षकांनी सामाजिक सुधारण्याचा वसा घेतल्याने पारधी समाजाची असणारी भीती आणि गुन्हेगारी वृत्ती भविष्यात निश्चितच नाहीशी होईल. पारधी समाजातील या आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे.-बिपीन हसबनीसपोलीस निरीक्षक