शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Paralympics 2020 : रौप्यही आपले अन् कांस्यही; भारताच्या मरियन थंगवेलू, शरद कुमार यांनी उंच उडीत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:20 IST

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं कांस्यपदकाची कमाई करून आजच्या दिवसाचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पदक खाते उघडले

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं कांस्यपदकाची कमाई करून आजच्या दिवसाचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पदक खाते उघडले. सायंकाळच्या सत्रात भारताच्या मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी T63 गटाच्या अंतिम फेरीत अविश्वसनीय कामगिरी केली. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मरियप्पनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर शरद कुमारला १.८३ मीटर उंच उडीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांसह १० पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.    

२०१६मध्ये उंच उडीत मरियप्पन थंगावेलूनं सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानं १.८९ मीटर उंच उडी मारली होती आणि  मरियप्पन यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. याच गटात कांस्यपदकही वरूण सिंग भाटी ( १.८६ मी.) याच्या नावावर राहिले होते. ( Mariyappan Thangavelu and Varun Singh Bhati both won medals in the Men's High Jump F42 category at the Rio 2016 Paralympics. Mariyappan won the #Gold whereas Varun Singh won the #Bronze ) . आजच्या फायनलमध्ये वरूण सिंग भाटीनं पहिल्या प्रयत्नात १.६९ मीटर उंच उडी मारली. मरियप्पन व शरद यांनी सहकारी वरूण यापेक्षा अधिक म्हणजे १.७३ मीटर उंच उडी मारण्याचा निर्णय घेतला. ( Varun Singh Bhati successfully attempted the 1.69m height in his first attempt.) आणि या दोघांनी पहिल्याच प्रयत्नात १.७३ मीटरची उंच उडी मारली.  दोन अपयशी प्रयत्नानंतर वरूण भाटीनं अखेर १.७३ मीटर उंच उडी मारली.

त्यानंतर उंच उडीची उंची १.७७ मीटर करण्यात आली. अमेरिकेच्या एर्झा फ्रेंच व सॅम ग्रेव आणि भारताचा मरियप्पन व वरूण यांनी १.७७ मीटरची उंची यशस्वीरित्या पार केली. त्यानंतर मरियप्पननं १.८० मीटर उंच उडी मारून मोठी झेप घेतली. पण, वरुणला तीनही प्रयत्नांत १.८० मीटर उंच उडी मारता आली नाही. त्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. ( Varun is out of medal contention as he fails to clear the 1.80m mark in his third attempt as well) आता भारताचा शरद कुमार व मरियप्पन यांच्यावरच मदार होती आणि या दोघांनी १.८३ मीटर उंच उडी घेत सत्रातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

१.८३ मीटरच्या पहिल्या प्रयत्नात मरियप्पन व शरद अपयशी ठरले. अमेरिकेचा सॅम ग्रेव हाही भारतीय खेळाडूंना कडवी टक्कर देत होता. पण, मरियप्पन व शरद यांच्याप्रमाणेच त्यालाही दोन प्रयत्नांत १.८३ मीटर उंच उडी मारता आली नाही. मरियप्पननं तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळवून सुवर्णपदकावर दावा सांगितला. शरदला तीनही प्रयत्नात अपयश आल्यानं तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाला आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ( Shared Kumar get bronze medal in the men’s high jump T42 category with a jump of 1.83m)  ऑलिम्पिक चॅम्प मरियप्पन व वर्ल्ड चॅम्प ग्रेव यांच्यात सुवर्णपदकाची लढत झाली. या दोघांसमोर १.८८ मीटरचे लक्ष्य होते. मरियप्पनला तीनही प्रयत्नात अपयश आले अन् ग्रेवनं तिसऱ्या प्रयत्नात हे लक्ष्य पार करून मरियप्पनला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद केले,

नेमबाज सिंघराज अधानाला कांस्यसिंघराजनं नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंगराजनं २१६.८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केलं. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटात वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रुबिना फ्रान्सिसला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारतासाठी हा मोठा धक्का होता. महिलांच्या गोळाफेक F34 फायनलमध्ये भाग्यश्री जाधवला ७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिनं ७ मीटर लांब गोळाफेक करून सर्वोत्तमक वैयक्तिक कामगिरी केली. सोमवारी  नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर  देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ