शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:10 IST

पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला.

नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची थकलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा शनिवारी तिरंदाज आदिल अन्सारीने पूर्ण केली. पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. आदिल आणि नवीन ही जोडी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीमधील सुवर्णपदक विजेती जोडी आहे. या दोघांमध्येच अंतिम झुंज होणार हे अपेक्षित होते. त्या प्रमाणेच झालेल्या या अंतिम लढतीत आदिलने पहिल्या सेटपासून एकतर्फी वर्चस्व राखले. यात दुसऱ्या सेटला दोनदा आणि चौथ्या सेटला दोनदा १० गुणांचा वेध घेत आदिलने आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर अखेरचा सेटही तेवढाच अचूक खेळत त्याने सुवर्णपदक निश्चित केले. नवीनला आज आदिलच्या सातत्यसमोर टिकताच आले नाही. त्याला लय गवसली नाही. मात्र, आता आम्ही दोघेही नव्याने पॅरा ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचे सांगितले. 

डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिलपदार्पणामध्ये या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी मी खास डावपेच आखले होते. यामुळे मला यानुसार दर्जेदार कामगिरी करता आली. यातूनच मी चॅम्पियन होण्याचे स्वप्न यशस्वीपणे साकारले. यासाठी मला  सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा शब्दामध्ये आदिलने सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.

आदिलची कामगिरी कौतुकास्पद : नीतू इंगोलेया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतची आदिलची कामगिरी कौतुकास्पद ठरली. याच दर्जेदार कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवता आला. महाराष्ट्र संघासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली. यातून महाराष्ट्र संघाच्या नावे तिरंदाजीमध्ये विक्रमी पदकाची नोंद झाली, अशा शब्दामध्ये मुख्य प्रशिक्षक नीतू इंगोले यांनी पदक विजेत्या आदिलच्या कामगिरीचे कौतुक केले. 

महाराष्ट्राचे पुरुष खेळाडू अंतिम फेरीतटेबल टेनिस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, महिला विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पुरुषांच्या पहिल्या एकेरीच्या उपांत्य लढतीत दत्तप्रसाद चौगुलेने तमिळनाडूच्या नितिशचे आव्हान कडव्या प्रतिकारानंतर ११-७, ११-५, ९-११, ११-८ असे परतवून लावले. त्यानंतर विश्व तांबेने अंतिम फेरी गाठताना दिल्लीच्या योगेश मुखर्जीचा एकतर्फी लढतीत ११-६, ११-७, ११-३ असा पराभव केला. 

अशोक कुमार आणि रिषित नथवानी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातच्या ध्रुव योगेश चुघने अशोककुमारचा तीन सेटच्या लढतीत ११-६, ११-५, ७-११, ११-६ असा पराभव केला. पवन कुमार शर्माने महाराष्ट्राच्या रिषीत नथवानीचे आव्हान असेच तीन गेमच्या लढतीत ११-६, ११-७, १२-१०, ११-५ असे संपुष्टात आणले. महिलांमध्ये वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हा दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला. चंडिगडच्या पूनमने वैष्णवीचे आव्हान ११-८, ७-११, ११-६, ११-९ असे मोडून काढले. गुजरातच्या भाविका कुकोडियाने उज्वलाचा ११-३, ११-९, ११-७ अस पराभव केला.  महाराष्ट्राचे सहावे स्थान कायमपदक तालिकेत महाराष्ट्र १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्राँझ अशा २८ पदकांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. हरियानाने पदकाचे शतक गाठले असून, आघाडी कायम राखताना त्यांना आतापर्यंत ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि २४ ब्राँझपदके मिळविली आहे. उत्तर प्रदेश (२४, २१, १०) दुसऱ्या, तमिळनाडू (१८, ७, १३) तिसऱ्या, गुजरात (१४, १८, १६) चौथ्या आणि राजस्थान (१०, २०, १३) पाचव्या स्थानावर आहेत.

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र