पंकज अडवाणीचे पदक पक्के

By Admin | Updated: April 28, 2017 02:09 IST2017-04-28T02:09:49+5:302017-04-28T02:09:49+5:30

भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवाणी याने आज येथे आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले.

Pankaj Advani's medal is confirmed | पंकज अडवाणीचे पदक पक्के

पंकज अडवाणीचे पदक पक्के

दोहा : भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवाणी याने आज येथे आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले. आज १६ वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन असणाऱ्या पंकज अडवाणी याला चांगलाच सूर गवसला. त्याने संयुक्त अरब अमिरातचा दिग्गज स्नूकर मोहम्मद अल जोकर याचा उपांत्यपूर्व फेरीत ५-१ असा पराभव करीत भारतासाठी एकमेव पक्के केले. याआधी अडवाणीने ४-१, ४-१ आणि ४-0 असा विजय नोंदवत अंतिम ३२ आणि अंतिम १६ मध्ये प्रवेश केला होता. या स्पर्धेत अव्वल आठमध्ये असणारा पंकज अडवाणी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या महिन्याच्या प्रारंभी आशियाई बिलियर्डस चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याने आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक दोन पदके जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

Web Title: Pankaj Advani's medal is confirmed