पंकज अडवाणी १३व्यांदा विश्वविजेता

By Admin | Updated: August 12, 2015 04:22 IST2015-08-12T04:22:49+5:302015-08-12T04:22:49+5:30

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने विश्व ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजय संपादन करून आपल्या कारकिर्दीतील १३वे जागतिक विजेतेपद आपल्या नावावर राखले.

Pankaj Advani 13th World Winner | पंकज अडवाणी १३व्यांदा विश्वविजेता

पंकज अडवाणी १३व्यांदा विश्वविजेता

कराची : भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने विश्व ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजय संपादन करून आपल्या कारकिर्दीतील १३वे जागतिक विजेतेपद आपल्या नावावर राखले.
चॅम्पियन अडवाणीने अंतिम लढतीत चीनच्या यानी बिंगाताओचा ६-२ असा पराभव केला. अडवाणीने सुरुवातीपासून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून बेस्ट आॅफ ११च्या प्रारूपात ३-० अशी आघाडी घेतली होती. नंतर चीनच्या यानीने चांगला खेळ करून पुढील दोन फ्रेम जिंकल्या. त्यानंतरच्या दोन्ही फ्रेम अडवाणीने जिंकून पुन्हा आघाडी घेतली.
अडवाणीने सातव्या फ्रेममध्ये ७१ गुणांचा ब्रेक करून गतवर्षी इजिप्त येथे जिंकलेला विश्वचषक आपल्याकडेच राखला. अडवाणीने ही लढत ३७-२१, ५:३०:-०, ३२-२९, ०-६६:६६, ६-३८:३७, ४८-०, ७५:७१:-०, ४०:३५:-२८ गुणांनी जिंकली.
(वृत्तसंस्था)

Web Title: Pankaj Advani 13th World Winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.