भारताची गाठ पाकशी
By Admin | Updated: December 12, 2014 01:40 IST2014-12-12T01:40:58+5:302014-12-12T01:40:58+5:30
आशियाड सुवर्ण विजेत्या भारतीय संघाने गुरुवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात बेल्जियमचा 4-2ने पराभव करीत येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

भारताची गाठ पाकशी
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : यजमानांनी बेल्जियमचा 4-2ने उडविला धुव्वा
भुवनेश्वर : आशियाड सुवर्ण विजेत्या भारतीय संघाने गुरुवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात बेल्जियमचा 4-2ने पराभव करीत येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. उपांत्य फेरीत भारताची गाठ शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या संघांदरम्यान खेळला जाईल.
भारताने दोन गोलने माघारल्यानंतरही मुसंडी मारून रोमहर्षक विजय मिळविला. पहिल्या 18 मिनिटांच्या खेळात भारतीय संघ क्-2ने माघारला होता. कलिंगा स्टेडियमच्या निळ्या टर्फवर भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज दिली. स्पर्धेच्या सुरुवातीला जर्मनी आणि अर्जेटिनाकडून भारताला पराभवाचा धक्का बसला. पण अखेरच्या साखळी सामन्यात विश्वचषक उपविजेत्या हॉलंडचा 3-2ने पराभव करीत आश्चर्याचा धक्का दिला. या विजयामुळे उत्साही झालेल्या भारतीय खेळाडूंनी आज वर्चस्वपूर्ण खेळ करीत आघाडी घेणा:या बेल्जियमविरुद्ध धीर न सोडता जोरदार मुसंडी मारली.
फेलिक्स डेनायेर याने 12व्या मिनिटाला बेल्जियमचे खाते उघडले. 18व्या मिनिटाला सॅबेस्टियन डोकियारने आघाडी दुप्पट केली होती. भारताने याच मिनिटाला चोख प्रत्युत्तर देत पेनल्टी कॉर्नर मिळविला. रुपिंदरने उजव्या कोप:यातून मारलेला चेंडू थेट गोलजाळीचा वेध घेऊन गेला. यानंतर उथप्पाने 27व्या मिनिटाला बरोबरी साधली. तिस:या क्वॉर्टरमध्ये वीरेंद्र लाक्रा याला हिरवे कार्ड दाखविताच पुढची 2 मिनिटे भारतीय संघ 1क् खेळाडूंसह खेळला. 41व्या मिनिटाला आकाशदीपने तिसरा गोल नोंदविला. 49व्या मिनिटाला कर्णधार सरदारासिंगच्या पासवर धर्मवीरने चौथा गोल केला. ही आघाडी सामना संपेर्पयत कायम राखण्यात भारतीय खेळाडूंना यश आले. (वृत्तसंस्था)