पहिल्या कसोटीतच भारताने मोडला पाकचा वर्ल्ड रेकॉर्ड

By Admin | Updated: February 23, 2017 16:28 IST2017-02-23T16:28:49+5:302017-02-23T16:28:49+5:30

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये आज सुरूवात झाली.

Pakistan's world record was broken by India in the first Test | पहिल्या कसोटीतच भारताने मोडला पाकचा वर्ल्ड रेकॉर्ड

पहिल्या कसोटीतच भारताने मोडला पाकचा वर्ल्ड रेकॉर्ड

>ऑनलाइन लोकमत 
 पुणे , दि. 23 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान  4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये आज सुरूवात झाली. यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजे स्टेडियम भारतातली 25 वं टेस्ट सेंटर बनलं. या सामन्याला सुरूवात होताच भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला. 
काय आहे हा विक्रम- 
 आतापर्यंत सर्वात जास्त मैदानावर कसोटी खेळण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. त्यांनी 79 मैदानांवर कसोटी सामने खेळले आहेत. तर गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेला सामना हा भारताचा 80 व्या मैदानावरील सामना ठरला त्यामुळे भारताने पाकिस्तानचा  विश्वविक्रम तोडला. 
आतापर्यंत कोणत्या संघाने किती मैदानांवर सामने खेळले-
 -80 भारत
-79 पाकिस्तान
-74 न्यूझीलंड, वेस्टइंडीज
-72 श्रीलंका
-71 इंग्लैंड
-70 ऑस्ट्रेलिया
-62 द. अफ्रीका
-36 झिम्बाब्वे
-35 बांगलादेश
 

Web Title: Pakistan's world record was broken by India in the first Test