वर्ल्डकप सराव सामन्यात पाकचा विजय
By Admin | Updated: February 11, 2015 16:59 IST2015-02-11T16:59:07+5:302015-02-11T16:59:07+5:30
इंग्लंडविरुध्द पाकिस्तान यांच्यात आज खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सराव सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडचा ४ विकेट आणि ७ चेंडू राखून पराभव केला.

वर्ल्डकप सराव सामन्यात पाकचा विजय
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ११ - इंग्लंडविरुध्द पाकिस्तान यांच्यात आज खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सराव सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडचा ४ विकेट आणि ७ चेंडू राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंड संघाने ५० षटकांत २५० धावा केल्या. इंग्लंडकडून जोए रुटने सर्वाधिक ८५ धावा केल्या. सलामीला आलेला अली ४ धावा काढून स्वस्तात बाद झाला. हेल्स ३१, बॅलेन्स ५७, मॉर्गन ०, बोपारा ११, बटलर १३, ब्रॉड ० तर जॉर्डन ३१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंड संघाने ८ गडयांच्या बदल्यात २५१ धावांचे आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवले. इंग्लंडचे हे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या पाकची सुरूवात खराब झाली सलामीला आलेले नाशिर जमशेद १ व अहमद शहजाद अवघ्या २ धावांवर एकापाठोपाठ एक बाद झाले. परंतू त्यानंतर आलेल्या यूनुस खान व सोहेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यूनुसने १९, सोहेलने ३३, उमर अकमलने ६५, शोएब मकसूदच्या २० धावांबरोबरच मिसबाह उल हकने केलेल्या ९१ धावांच्या नाबाद खेळीमुळे पाकिस्तानला इंग्लंडवर विजय मिळविता आला.