पाकिस्तानचे पारडे जड
By Admin | Updated: November 5, 2015 02:26 IST2015-11-05T02:26:00+5:302015-11-05T02:26:00+5:30
मोहंमद हफीजच्या शतकानंतर आपला अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या शोएब मलिकच्या २ बळींच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वर्चस्व मिळवले.

पाकिस्तानचे पारडे जड
शारजा : मोहंमद हफीजच्या शतकानंतर आपला अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या शोएब मलिकच्या २ बळींच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वर्चस्व मिळवले.
इंग्लंडने २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवस अखेर २ बाद ४६ धावा केल्या आहेत. कर्णधार अॅलेस्टर कुक (१७) व जो रुट (६) धावांवर खेळत आहेत.
पाकला मालिकेत २-० विजय नोंदवण्यापासून रोखण्यासाठी इंग्लंडला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी २३८ धावांची गरज आहे; परंतु खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देत आहे. अशा परिस्थितीत लक्ष्य गाठणे सोपे नाही. पाकिस्तानने त्यांच्या दुसऱ्या डावात ३५५ धावा केल्या होत्या.