ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. १४ - चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्तानने विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला. जल्लोष करण्याच्या नादात अनेक खेळाडूंनी मैदानावरच आपले कपडे काढले. याविरोधात आक्षेप नोंदवित भारताने पाकिस्तानविरूध्द तक्रार नोंदविली आहे.
पाकिस्तानी संघाने भारतावर ४-३ असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली. हा विजय साजरा करण्यासाठी पाकिस्तनी खेळाडूंनी शर्ट उतरविले तसेच प्रेक्षकांच्या दिशेन भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला. विजयाचा जल्लोष करावा पण त्याला अश्लिल हावभाव नसावा असे सांगत पाकिस्तानी खेळाडूंच्या या जल्लोषाविरूध्द भारताने नाराजी व्यक्त करीत तक्रार नोंदविली आहे, अशी माहिती भारतीय हॉकी संघाचे नरेंद्र बत्रा यांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंच्या अश्लिल जल्लोषाबद्दल पाकिस्तानी हॉकी संघाचे कोच शाहनाज शेख यांनी माफी मागितली आहे.