पाकिस्तानी चाहत्याला विराट देणार गिफ्ट !

By Admin | Updated: July 29, 2016 23:40 IST2016-07-29T23:40:57+5:302016-07-29T23:40:57+5:30

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या एका पाकिस्तानी चाहत्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देणार आहे.

Pakistani fans will give a gift! | पाकिस्तानी चाहत्याला विराट देणार गिफ्ट !

पाकिस्तानी चाहत्याला विराट देणार गिफ्ट !

ऑनलाइन लोकमत
किंग्सटन, दि. 29 - अल्पावधीतच जगातील धुरंदर फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलेला भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या एका पाकिस्तानी चाहत्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देणार आहे. हा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून नामांकित पंच आलिम दार यांचा मुलगा आहे.
युवा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. पाकिस्तानही याला अपवाद नाही. त्यांच्या फॅनलिस्टमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आता या यादीत आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील पाकिस्तानी पंच आलिम दार यांचा मुलगा हसनचा समावेश झाला आहे. हसन विराटच्या बॅटींगच्या प्रेमात पडला आहे, अंटिग्वामध्ये विराटने केलेली द्विशतकी खेळी त्याला खूपच आवडली. विराटला ही गोष्ट समजताच त्याने हसनला भेटण्यास बोलावले आहे, इतकेच नाही तर त्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देण्याचे वचन दिले आहे.
यापूर्वी विराटने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरला बॅट भेट दिली आहे. यावर्षी झालेल्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डनवरील त्या ऐतिहासिक सामन्यानंतर त्याने आमिरला ही गिफ्ट दिली होती.
विराटचे पाकिस्तानमध्ये अनेक चाहते आहेत. माजी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलूचने तर त्याला लग्नाची ‘आॅफर’ दिली होती. त्याशिवाय विराटच्या एका पाकिस्तानी चाहत्याने आपल्या घरावर तिरंगा फडकावला होता. त्याबद्दल त्या चाहत्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती.

Web Title: Pakistani fans will give a gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.