पाकिस्तानमध्ये विराटचा जुळा, कराचीमध्ये बनवतोय पिझ्झा
By Admin | Updated: June 13, 2017 19:55 IST2017-06-13T18:31:22+5:302017-06-13T19:55:49+5:30
पाकिस्तानकडे विराट कोहलीच्या तोडीचा किंवा कोहलीला साधी टक्कर देऊ शकेल असा एकही खेळाडू नाहीये. मात्र, विराट सारखाच दिसणारा त्याचा जुळा पाकिस्तानमध्ये आहे.

पाकिस्तानमध्ये विराटचा जुळा, कराचीमध्ये बनवतोय पिझ्झा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भारताचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. पाकिस्तानसोबत खेळताना तर कोहली जरा जास्तच आक्रमक असतो. 4 जून रोजी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यातही कोहलीने दमदार प्रदर्शन केलं होतं. कोहली किती उच्च स्थराचा खेळाडू आहे हे पाकिस्तानी पत्रकार नजराना गफार यांच्या ट्विटमुळेच समजून येतं. भारताने आमचा अख्खा संघ घ्यावा पण विराट कोहली आम्हाला द्यावा असं ट्विट त्यांनी केलं होतं.
पाकिस्तानकडे विराट कोहलीच्या तोडीचा किंवा कोहलीला साधी टक्कर देऊ शकेल असा एकही खेळाडू नाहीये. मात्र, विराट सारखाच दिसणारा त्याचा जुळा पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानच्या कोहलीविषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता आणि दोन दिवसातच तो व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला.
कोहलीसारखाच दिसणारा हा तरूण कोणी क्रिकेटपटू नसून तो कराची येथील शहीद-ए-मिलात च्या एका पिझ्झा आउटलेटमध्ये काम करतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हा तरूण पिझ्झा बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्स मात्र थक्क झाले. कारण व्हिडीओमधला तरूण हा पूर्णतः कोहलीसारखाच दिसतो.
"जस्ट पाकिस्तानी थिंग" नावाच्या एका फेसबुक पेजने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. दोन दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून 8 हजाराहून जास्त जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ-