पाकने इंग्लंडला २१६ धावांवर रोखले
By Admin | Updated: November 11, 2015 23:07 IST2015-11-11T23:07:01+5:302015-11-11T23:07:01+5:30
मोहंमद इरफान, शोएब मलिक आणि अन्वर अली यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २१६ धावांत रोखले.

पाकने इंग्लंडला २१६ धावांवर रोखले
अबुधाबी : मोहंमद इरफान, शोएब मलिक आणि अन्वर अली यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २१६ धावांत रोखले.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले; परंतु त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि त्यांची पहिल्या ४ षटकांतच ३ बाद १४ अशी स्थिती केली; परंतु त्यानंतर इयॉन मॉर्गन आणि जेम्स टेलर यांनी चौथ्या गड्यासाठी २७.२ षटकांत १३३ धावांची भागीदारी करताना इंग्लंड संघाची पडझड थांबवली; परंतु शोएब मलिकने मॉर्गनला सर्फराज अहमदकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली आणि त्यानंतर इंग्लंडकडून मोठी भागीदारी होऊ शकली नाही व अखेर त्यांचा संघ ४९.४ षटकांत २१६ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन याने ९६ चेंडूंत ११ चौकारांसह ७६ आणि जेम्स टेलरने ८२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६0 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहंमद इरफान सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अन्वर अली आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : ४९.४ षटकांत सर्वबाद २१६ (मॉर्गन ७६, जेम्स टेलर ६0, मोहंमद इरफान ३/३५, अन्वर अली २/३२, शोएब मलिक २/४५, यासीर शाह १/३८).