पाकिस्तानकडून भारत पराभूत
By Admin | Updated: September 26, 2014 04:41 IST2014-09-26T04:41:29+5:302014-09-26T04:41:29+5:30
गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकी लढतीत भारतीय पुरुष हॉकी टीमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १-२ ने मात खाण्याची नामुष्की ओढावली़ भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव

पाकिस्तानकडून भारत पराभूत
गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकी लढतीत भारतीय पुरुष हॉकी टीमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १-२ ने मात खाण्याची नामुष्की ओढावली़ भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला़ ‘ब’ गटातील सामन्यात पाकिस्तानकडून मोहंमद उमर भुट्टा याने ३८व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली़ यानंतर भारताच्या निकीन थिमैया याने ५२ व्या मिनिटाला गोल करताना १-१ अशी बरोबरी साधून दिली़ यानंतर मात्र भारतीय खेळाडूंना पाकिस्तानवर गोल नोंदविता आला नाही़ पाकच्या मोहंमद वकास याने ५३ व्या मिनिटाला गोल करून संघाला २-१ असा विजय मिळवून दिला़
स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातील भारताचा हा पहिलाच पराभव आहे़ दुसरीकडे पाकिस्तानने स्पर्धेतील तीनही सामन्यांत बाजी मारली आहे़ ‘ब’ गटात पाक संघ आता आठ गुणांसह आघाडीवर आहे़
भारतीय संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे़ पाकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना यजमान दक्षिण कोरियाशी होऊ शकतो़ दरम्यान, स्पर्धेतील अखेरच्या साखळी
लढतीत भारताचा सामना चीनशी होणार आहे़ हा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे़