पाकिस्तानचा विंडीजवर विजय

By Admin | Updated: September 26, 2016 00:13 IST2016-09-26T00:13:04+5:302016-09-26T00:13:04+5:30

कर्णधार सर्फराज अहमद (नाबाद ४६) आणि खलिद लतिफ (४० ) यांची शानदार फलंदाजी आणि गोलंदाज सोहेल तन्वीर आणि हसन अली यांनी घेतलेले प्रत्येकी तीन बळी

Pakistan beat West Indies | पाकिस्तानचा विंडीजवर विजय

पाकिस्तानचा विंडीजवर विजय

दुबर्ई : कर्णधार सर्फराज अहमद (नाबाद ४६) आणि खलिद लतिफ (४० ) यांची शानदार फलंदाजी आणि गोलंदाज सोहेल तन्वीर आणि हसन अली यांनी घेतलेले प्रत्येकी तीन बळी या जोरावर पाकिस्तानने विंडीज् विरोधातील तीन सामन्यांच्या टष्ट्वेंटी -२० मालिकेचा दुसरा सामना १६ धावांनी जिंकला.त्यासोबत विश्वविजेत्या संघासोबतची ही मालिका २ -० ने जिंकली आहे.
वेस्ट इंडिज्ने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.मात्र त्याची सुरूवात चांगली झाली नाही. पाकिस्तानचा सलामीवीर शार्जिल खान चार धावावर बाद झाला. त्यानतर लतीफने बाबर आझम सोबत दुसऱ्या गड्यासाठी ५.५ षटकांत ५४ धावाची भागिदारी केली. लतीफने ३६ चेंडूत चाळीस धावा केल्या.

Web Title: Pakistan beat West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.