पाक विजय
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:21+5:302015-02-10T00:56:21+5:30
बांगलादेशवरील विजयात

पाक विजय
ब ंगलादेशवरील विजयात पाकने गाळला घामसिडनी : उंचपुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानची अष्टपैलू कामगिरी (५२ धावा, पाच बळी), तसेच सोहेब मक्सूदच्या नाबाद खेळीच्या (९३ धावा) बळावर पाकने विश्वचषक सराव सामन्यात बांगलादेशवर सोमवारी ११ चेंडूंआधी विजय नोंदविला खरा; पण त्यासाठी त्यांना चांगलाच घाम गाळावा लागला.बांगलादेशकडून तमीम इक्बाल (८१) आणि मेहमूदुल्लाह (८३) यांच्या अर्धशतकांमुळे ४९.५ षटकांत २४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पाकने हे लक्ष्य ४८.१ षटकांत ७ बाद २७४ धावा करीत गाठले. तास फूट एक इंच उंचीचा वेगवान मोहम्मद इरफान याने ५२ धावांत पाच गडी बाद केले. लेग स्पिनर यासिर शाह याने ४२ धावा देत दोन गडी टिपले. सोहेल खान आणि वहाब रियाझ यांनी एकेक गडी बाद केला.पाकने सलामीचे दोन गडी आठ धावांत गमावले होते. १०३ धावा होईस्तोवर चार गडी तंबूत परतले. मक्सूदने ९० चेंडूंवर चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९३ धावा ठोकल्या. सोहेलने ३९, यष्टिरक्षक उमर अकमल याने ३९ आणि अष्टपैलू शाहीद आफ्रिदी याने २४ धावांचे योगदान दिले. मुशर्रफ मूर्तझा आणि तस्किन अहमद यांनी पराभूत संघाकडून प्रत्येकी दोन बळी घेतले.(वृत्तसंस्था)...................................................................................