क्रीडा सराव जोड
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:16+5:302015-01-23T23:06:16+5:30
कसोटी मालिकेनंतर वन-डे मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विश्वकप संघात समावेश असलेला शिखर धवन सध्या फॉर्मात नाही. त्याला गेल्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा करता आल्या.

क्रीडा सराव जोड
क ोटी मालिकेनंतर वन-डे मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विश्वकप संघात समावेश असलेला शिखर धवन सध्या फॉर्मात नाही. त्याला गेल्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा करता आल्या. सराव सत्रादरम्यान फ्लेचरने धवनला मार्गदर्शन केले. व्हीडीओ समीक्षकाच्या मदतीने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धवनच्या पायांच्या हालचालींचे चित्रण करण्यात आले. या व्यतिरिक्त धवनने फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर दुसऱ्या नेट्समध्ये सराव करीत खेळात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिसऱ्या वन-डे लढतीमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. धवन व्यतिरिक्त मधल्या फळीतील कर्णधार धोनीने नेट्समध्ये कसून सराव केला. गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनीने एकूण ५३ धावा फटकाविल्या. संघातील धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी दुसऱ्या स्थानी आहे. या व्यतिरिक्त अजिंक्य रहाणे व अबांती रायडू यांनी फलंदाजीचा कसून सराव केला. दुखापतीमुळे दुसऱ्या लढतीला मुकलेला रोहित शर्मा सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. विराट कोहलीनेही आज सराव केला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेला युवा फलंदाज विराट कोहलीला गेल्या दोन सामन्यांत केवळ १३ धावा फटकाविता आल्या आहेत. (वृत्तसंस्था)