पेसने जिंकले हंगामातील पहिले विजेतेपद

By Admin | Updated: April 3, 2017 10:32 IST2017-04-03T00:53:24+5:302017-04-03T10:32:39+5:30

लिएंडर पेसने कॅनडाच्या आदिल शमसदीन याच्या साथीने लियोन चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीतील विजेतेपद पटकावले.

Paes won the first title of the season | पेसने जिंकले हंगामातील पहिले विजेतेपद

पेसने जिंकले हंगामातील पहिले विजेतेपद


लियोन (मेक्सिको) : लिएंडर पेसने कॅनडाच्या आदिल शमसदीन याच्या साथीने लियोन चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीतील विजेतेपद पटकावले. त्याचे या हंगामातील हे पहिले विजेतेपद ठरले. पेस आणि आदिल या जोडीने स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली आणि ब्राझीलच्या कारो जेम्पियेरी या जोडीचा ६-१, ६-४ अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करताना ७५,000 डॉलर बक्षीस रकमेचे हार्डकोर्ट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पेसचे हे २0 वे एटीपी चॅलेंजर विजेतेपद ठरले. पेसने गेल्या २६ वर्षांत जवळपास प्रत्येक वर्षी कमीत कमी एका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पेसने या हंगामात प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. याआधी तो दुबई चॅम्पियनशिप आणि डेलरे बीच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.
(वृत्तसंस्था)

Web Title: Paes won the first title of the season