पेसने जिंकली एगॉन इल्कले चॅलेंजर्स ट्रॉफी

By Admin | Updated: June 25, 2017 00:03 IST2017-06-25T00:03:57+5:302017-06-25T00:03:57+5:30

भारताचा अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेस याने विम्बल्डनसाठी चांगला सराव करताना कॅनडाचा जोडीदार आदिल शम्सदीन याच्या साथीने शनिवारी एगॉन इल्कले चॅलेंजर ट्रॉफी जिंकली.

Paes wins Aegon Illyll Challengers Trophy | पेसने जिंकली एगॉन इल्कले चॅलेंजर्स ट्रॉफी

पेसने जिंकली एगॉन इल्कले चॅलेंजर्स ट्रॉफी

इल्कले (ग्रेट ब्रिटन) : भारताचा अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेस याने विम्बल्डनसाठी चांगला सराव करताना कॅनडाचा जोडीदार आदिल शम्सदीन याच्या साथीने शनिवारी एगॉन इल्कले चॅलेंजर ट्रॉफी जिंकली.
या जोडीने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना ब्रारुडन क्लिन आणि जो सॅलिसबरी या जोडीवर मात केली. अव्वल मानांकित पेस-शम्सदीन या जोडीने स्थानिक वाइल्डकार्डप्राप्त जोडीचा अंतिम सामन्यात २-६, ६-२, १०-८ असा पराभव केला. विशेष म्हणजे दोन्ही प्रतिस्पर्धी जोडीने एकमेकांची प्रत्येकी दोनदा सर्व्हिस तोडली.
हे पेसचे एटीपी चॅलेंजर टूर हंगामातील तिसरे विजेतेपद आहे आणि शम्सदीनच्या साथीने दुसरे आहे. भारताच्या या ४५ वर्षीय खेळाडूने एप्रिलमध्ये अमेरिकेचा जोडीदार
स्कॉट लिप्सकीच्या साथीने तलाहासी चॅलेंजर स्पर्धा जिंकली होती. त्याने हंगामातील पहिले विजेतेपद मार्च महिन्यात शम्सदीनच्या साथीने मेक्सिकोत लियोनमध्ये पटकावले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Paes wins Aegon Illyll Challengers Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.