पेस - स्टेपनेक जोडी उपांत्य फेरीत
By Admin | Updated: July 4, 2014 04:44 IST2014-07-04T04:44:07+5:302014-07-04T04:44:07+5:30
भारताच्या लिएंडर पेस आणि रादेक स्टेपनेक या जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

पेस - स्टेपनेक जोडी उपांत्य फेरीत
लंडन : भारताच्या लिएंडर पेस आणि रादेक स्टेपनेक या जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने कॅनडाचा डॅनिएल नेस्टर आणि सर्बियाचा नेनाद झिमोजींक या जोडीवर ३-६, ७-६ (७-५), ६-३, ६-४ असा विजय मिळवला. पेस आणि स्टेपनेकला आता उपांत्य फेरीत कॅनडाचा वासेक पोसपिसील आणि अमेरिकेचा जॅक सोक यांच्याशी सामना करावा लागणार आहे़ १९९९ साली पेसला विम्बल्डनमध्ये पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावण्यात यश आले होते; तर १९९९, २००३ व २०१० साली पेसने मिश्र दुहेरीत बाजी मारली होती. दरम्यान मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि रोमानियाचा होरिआ टेकाउ या जोडीचे आव्हान संपुष्टात आले. ब्रिटनच्या जॅमी मरे आणि आॅस्ट्रेलियाच्या कॅसेय देल्लाक्युआ या जोडीने ७-५, ६-३ने त्यांना सहज नमवले.