पेस, बोपन्ना, सानियाची माघार
By Admin | Updated: September 11, 2014 01:50 IST2014-09-11T01:50:17+5:302014-09-11T01:50:17+5:30
भारताचा एकेरीचा टेनिस खेळाडू सोमदेव देववर्मननंतर आता अनुभवी लिएंडर पेस, रोहन बोपन्ना आणि महिलांमध्ये सानिया मिर्झा दिग्गज टेनिस खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार

पेस, बोपन्ना, सानियाची माघार
नवी दिल्ली : भारताचा एकेरीचा टेनिस खेळाडू सोमदेव देववर्मननंतर आता अनुभवी लिएंडर पेस, रोहन बोपन्ना आणि महिलांमध्ये सानिया मिर्झा दिग्गज टेनिस खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताला अपेक्षित पदकांना मुकावे लागणार आहे़ इंचियोन येथे १९ सप्टेंबरपासून या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे़
या स्टार खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरदेखील अखिल भारतीय टेनिस संघाचे (एआयटीए) अध्यक्ष अनिल खन्ना यांनी त्यांचा बचाव केला . एआयटीएच्या मते पेस आणि बोपन्ना यांनी आपल्या क्रमवारीत घसरण होत असल्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले़ खेळाडूंना आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी डब्ल्यूटीए आणि एटीपी स्पर्धेत खेळणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे़
लंडन येथे होणाऱ्या एटीपी वर्ल्ड टूर आणि सिंगापूर येथील डब्ल्यूटीए फायनलसाठी प़्ाुरुष संघाला आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत एआयटीएने व्यक्त केले आहे़ एआयटीए खेळाडूबद्दल योग्य तो निर्णय घेत असते, कारण त्यांनी देशासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाची कामगिरी केलेली असते, असे त्यांनी सांगितले़
भारत सोमदेवच्या माघारीच्या धक्कयातून बोहर आलेला नसाता पेस, बोपण्णा व सानिया यांच्या आशियाई स्पर्धेतून माघारीच्या निर्णयामुळे अजूनच झटका बसला आहे. सोबदेवने गतवर्षी आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती. या सर्व खेळाडूंनी आपल्या मानांकनात सुधारणा करण्यासाठी माघार घेतली आहे. परंतू, एआयटीने जेव्हा आशियाई स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहिर केला तेव्हा त्यांना याचा अंदाज आला नाही का, की खेळाडू स्वता:च्या मानांकनासाठी देशाच्या संघातून माघार घेत आहेत. महासंघाचे अध्यक्ष खन्ना यांनी प्रथम सोपदेवची पाठराखण केली होती आता ते या तीघांची सुध्दा पाठराखण करीत आहेत. (वृत्तसंस्था)