शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

मुंबईच्या मुदितची ऐतिहासिक कामगिरी, ‘एनसीटीटीए’ विजेता पहिला भारतीय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:19 IST

भारताचे कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब- मुदित दानी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: युवा टेबल टेनिसपटू मुदित दानी याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना अमेरिकेतील नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशनच्या (एनसीटीटीए) वतीने देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे हा पुरस्कार पटकावणारा मुदित पहिला भारतीय ठरला आहे. २०२२-२३ वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

अमेरिका टेबल टेनिस संघटनेशी संलग्न असलेल्या एनसीटीटीच्या वतीने प्रत्येक मोसमाच्या अखेरीस अमेरिका आणि कॅनेडाच्या विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या मुदितने यंदा दोन सुवर्णपदके जिंकली. या जोरावर त्याने आपल्या संघाला एनसीटीटीए राष्ट्रीय जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली.

मुदितने २०१९ मध्ये यूएस ओपन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार खेळ करताना पहिले आयटीटीएफ पदक जिंकले होते, तसेच गेल्यावर्षी त्याने डब्ल्यूटीटी स्पर्धेत दुहेरी गटात उपांत्य फेरी गाठली होती. ‘एनसीटीटी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू पुरस्कार पटकावल्याचा आनंद आहे. हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याचा विशेष आनंद आहे. भारताचे कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब आहे,’ अशी प्रतिक्रिया मुदितने दिली.

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिस