भारतीय संघात पेसचे पुनरागमन

By Admin | Updated: August 15, 2015 02:04 IST2015-08-15T02:04:26+5:302015-08-15T02:04:26+5:30

डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व ग्रुप प्लेआॅॅफमध्ये काहीदिवसांपुर्वीच स्थान मिळवल्यानंतर भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अव्वल व सध्याचा सर्वात अनुभवी

Pace returns to Indian squad | भारतीय संघात पेसचे पुनरागमन

भारतीय संघात पेसचे पुनरागमन

डेव्हिस चषक : साकेतच्या जागी निवड

नवी दिल्ली : डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व ग्रुप प्लेआॅॅफमध्ये काहीदिवसांपुर्वीच स्थान मिळवल्यानंतर भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अव्वल व सध्याचा सर्वात अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याचे भारतीय संघात पुनरागम झाले आहे. आगामी १८ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतातच होणाऱ्या बलाढ्य झेक प्रजासत्ताक संघाविरुध्द पेसचा समावेश भारतीय संघात करण्यात आला. या सामन्यासाठी नुकताच चार खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
एशिया ओशियाना ग्रुप एक मधील न्यूझीलैंड विरुध्द ३-२ अशी बाजी मारलेल्या भारतीय संघात पेसचा सहभागन नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहन बोपन्ना, सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांनी भारतासाठी निर्णायक खेळ केला होता. युवा खेळाडू साकेत माइनेनी याच्या जागी अनुभवी पेसला संघात स्थान देन्यात आले आहे. काहीदिवसांपुर्वी निवडकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पेसला राष्ट्रीय संघात घेण्याचा निर्णय झाला. सोमदेव आणि युकी एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. तर दुहेरीमध्ये पेस आणि बोपन्ना विजयाची जबाबदारी पार पाडतील, असे निवडसमितीची अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Pace returns to Indian squad