पेस-हिंगीसची घोडदौड कायम

By Admin | Updated: May 30, 2015 01:48 IST2015-05-30T01:48:45+5:302015-05-30T01:48:45+5:30

मार्टिना हिंगीसच्या साथीने महिला दुहेरीत आगेकूच करणाऱ्या भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पराभव पत्करावा लागला.

Pace-Hingis crashed | पेस-हिंगीसची घोडदौड कायम

पेस-हिंगीसची घोडदौड कायम

मार्टिना हिंगीसच्या साथीने महिला दुहेरीत आगेकूच करणाऱ्या भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पराभव पत्करावा लागला. तथापि, भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांनी आपली घोडदौड कायम ठेवली.
लिएंडर पेस आणि हिंगीस या आठव्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीत त्यांच्या पहिल्या फेरीत रशियाच्या अल्ला कुद्रायावत्सेवा आणि कोलंबियाच्या जुआन सॅबेस्टियन काबेल या जोडीवर ६-१, ६-३ असा सहज विजय नोंदवला. आता त्यांची लढत स्लोव्होनियाच्या कॅटरिना सर्बोतनिक आणि रोमानियाच्या होरिया टेकाऊ यांच्याशी होईल.
तथापि, सानिया आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस या अव्वल मानांकित जोडीला पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावी लागली. त्यांना जर्मनीच्या अ‍ॅन्ना लेना गोरेनफिल्ड आणि नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर या अमानांकित जोडीकडून २-६, २-६ असा सनसनाटी पराभव पत्करावा लागला.
बोपन्नालादेखील मिश्र दुहेरीत अपयशाचा सामना करावा लागला. बोपन्ना आणि कझाकिस्तानच्या येरेस्लावा श्वेदोवा या जोडीला झेक प्रजासत्ताकच्या लुसी हार्डेका आणि पोलंडच्या मार्सिन मॅटकोव्सकी यांना एका संघर्षपूर्ण लढतीत ७-६, 0-६, १0-३ असे नमवले.
सानिया आणि सोरेस या अव्वल मानांकित जोडीची गोरेनफिल्ड व रॉजरविरुद्ध सुरुवात चांगली झाली नाही आणि प्रारंभीच ते 0-३ ने पिछाडीवर पडले. त्यानंतर गोरेनफिल्ड व रॉजर यांनी वर्चस्व राखताना सानिया आणि सोरेस यांना मुसंडी मारण्याची संधीच मिळू दिली नाही.
दुसऱ्या सेटमध्ये चौथ्या गेमपर्यंत दोन्ही जोड्यांनी त्यांची सर्व्हिस वाचवली; परंतु त्यानंतर गोरेनफिल्ड आणि रॉजरने ब्रेक पॉइंट घेताना ३-२ अशी आघाडी वाढवली. जर्मनी आणि नेदरलँडच्या या जोडीने पुन्हा सातव्या गेममध्ये सानिया व सोरेस यांची सर्व्हिस मोडली आणि आपली
सर्व्हिस कायम ठेवताना विजय मिळवला.
महिला दुहेरीत सानिया आणि तिची स्वीस जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी स्थानिक जोडी स्टेपानी फोरेत्ज आणि अमांडाईन हेस यांचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

Web Title: Pace-Hingis crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.