पी. व्ही. सिंधू प्रबळ दावेदार
By Admin | Updated: January 24, 2017 00:30 IST2017-01-24T00:30:29+5:302017-01-24T00:30:29+5:30
रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताच्या पी.व्ही. सिंधूला उद्यापासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय

पी. व्ही. सिंधू प्रबळ दावेदार
लखनऊ : रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताच्या पी.व्ही. सिंधूला उद्यापासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. दुसरीकडे नुकत्याच मलेशिया ओपनमध्ये विजेतेपद जिंकलेल्या सायना नेहवालने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अव्वल मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत अनुरा प्रभुदेसाईसोबत लढत द्यावी लागेल. सिंधूला उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल करण्यास फारशी अडचण येणार नाही. उपांत्य फेरीत तिला चौथ्या मानांकित फितरियानीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष विभागात श्रीकांतच्या कामगिरीवर नजर राहील. टाचेच्या दुखापतीमुळे चार महिने कोर्टपासून दूर असलेला श्रीकांत या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पुनरागमन करण्यास प्रयत्नशील आहे.