पी. व्ही. सिंधू एशियन चॅम्पियनशीपमधून बाहेर
By Admin | Updated: April 29, 2017 00:58 IST2017-04-29T00:58:18+5:302017-04-29T00:58:18+5:30
रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर पडली आहे.

पी. व्ही. सिंधू एशियन चॅम्पियनशीपमधून बाहेर
वुहान : रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर पडली आहे. आज येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिला गेम जिंकल्यानंतरही चीनच्या बिंगजियाओविकडून ती पराभूत झाली. एक तास १७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चतुर्थ मानांकित सिंधूला आठवे मानांकनप्राप्त चीनी खेळाडूने २१-१५, १४-२१, २२-२४ असे हरवले. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पहिला गेम सिंधूने तर दुसरा गेम बिंगजियाओ हिने जिंकल्याने सामन्यात बरोबरी झाली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये काटाजोड टककर दिसून आली. सुरवातीला माघारीवर पडलेल्या सिंधूने १६-१६ अशी बरोबरी साधून आव्हान निर्माण केले. १९-१९ अशा बरोबरीनंतर बिंगजियाओने मॅच पॉर्इंट मिळवला, परंतु सिंधूने २0-२0 आणि पुन्हा २१-२१ अशी बरोबरी साधली. २२-२१ वर असताना सिंधूने मॅच पॉर्इंट मिळवला, परंतु बिंगजियाओने सलग तीन गुण घेत गेम आणि सामना जिंकला. (वृत्तसंस्था)