शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

P. V. Sindhu : सिंधू कशी झाली 'सिल्व्हर'कन्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:47 IST

P. V. Sindhu : जगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने.

सायनाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताच्या ताकदीची झलक दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडू जिंकू शकतात, हा विश्वास तिने मिळवून दिला.  मात्र, पी. व्ही. सिंधूने सायनाच्या कामगिरीने प्रेरणा घेऊन त्याही पुढे पाऊल टाकत चीन, मलेशिया, कोरिया आणि जपान या बॅडमिंटनमधील महाशक्तीपुढे आव्हान निर्माण केले.

सिंधू पर्व कसे सुरू झाले?१३व्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा गाजवल्यानंतर सिंधूने वयाच्या १४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सुरु झाले ते सिंधू पर्व...

सिंधूला हे सारे का जमते?‘सिंधूचा खेळाच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन जबरदस्त असून ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही,’ गुरु गोपीचंद यांच्या या वाक्यातून सिंधूने घेतलेली मेहनत कळून येते. 

महाशक्तीला आव्हान देत उभं केलं साम्राज्यजगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने. सायना ॲालिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय शटलर ठरली, तर सिंधू ॲालिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि सलग दोन ॲालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली शटलर ठरली. सलग दोन ॲालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती केवळ दुसरी भारतीय आहे हे विशेष.

अनेक अडथळ्यांचा सामना    वयाच्या ८व्या वर्षापासून रॅकेट हाती घेतल्यानंतर मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूला बॅडमिंटनचे धडे मिळाले. यासाठी तिला दररोज घरापासून ५६ किमी प्रवास करावा लागायचा.     हार मानेल ती सिंधू कसली. तिने कधीही सरावाचा दिवस चुकवला नाही. येथूनच कधीही हार न मानण्याची वृत्ती तिच्या अंगात आली.    गोपीचंद यांच्या अकादमीत प्रवेश घेतल्यानंतर चिमुकली सिंधू, चॅम्पियन सिंधू म्हणून सर्वांसमोर आली.

सिंधूने जिंकलेले महत्त्वाची पदकेकांस्य- ८रौप्य- ५सुवर्ण- ३

आशियाई ज्यूनिअर अजिंक्यपद : कांस्य (एकेरी व मिश्र २०११), सुवर्ण (२०१२)राष्ट्रकुल युवा स्पर्धा : सुवर्ण, २०११.दक्षिण आशियाई स्पर्धा : सुवर्ण (महिला सांघिक), रौप्य - एकेरी (२०११)आशियाई अजिंक्यपद : कांस्य (२०१४)राष्ट्रकुल स्पर्धा : कांस्य (२०१४), रौप्य (२०१८), सुवर्ण (२०१८, मिश्र गट)आशियाई क्रीडा : रौप्य (२०१८), कांस्य (२०१४ महिला सांघिक).जागतिक अजिंक्यपद :कांस्य (२०१३ आणि २०१४), रौप्य (२०१७ आणि २०१८), सुवर्ण (२०१९).ऑलिम्पिक : रौप्य (२०१६), कांस्य (२०२१)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू