पी. कश्यपचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: June 7, 2015 00:58 IST2015-06-07T00:58:03+5:302015-06-07T00:58:03+5:30
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यााला उपांत्य फेरीत आठव्या मानांकित मोमोटा कँतो याच्याकडून पराभव

पी. कश्यपचे आव्हान संपुष्टात
जकार्ता : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यााला उपांत्य फेरीत आठव्या मानांकित मोमोटा कँतो याच्याकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याचे शनिवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन
स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चेन लाँग याला धूळ चारत सनसनाटी निर्णय नोंदवणाऱ्या कश्यपला १ तास ११ मिनिटे रंगलेल्या उपांत्य फेरीत मोमोटा याने १२-२१, २१-१७, २१-१९, असे पराभूत केले.
कश्यप आणि कँतो हे दोन वर्षांनंतर आमने-सामने उभे ठाकले होते आणि जपानी खेळाडूने गेल्या वेळेप्रमाणेच या वेळेसही कश्यपवर विजय मिळवला.
कश्यपने आज उपांत्य फेरीत चांगली सुरुवात करताना २-0 अशी आघाडी घेतली; परंतु कँतो याने स्कोर ६-६ करीत बरोबरी साधली. पहिला सेट खूपच चुरशीचा ठरला. दरम्यान, कश्यपने ११-८ अशी आघाडी घेतली आणि नंतर सलग सहा गुण घेताना पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये कँतोने सुरुवातीलाच ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु कश्यपने मुसंडी मारत स्कोर ९-५ असा केला. मात्र, त्यानंतर सामन्याचे पारडे कँतो याच्याकडे झुकले. कँतोने दबावातही शानदार खेळ करताना दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले; परंतु १५-१0 अशा पिछाडीनंतर कश्यपने १९-२१ असा हा सेट आणि सामनाही गमावला. (वृत्तसंस्था)