पी. कश्यप मुख्य फेरीत

By Admin | Updated: September 21, 2016 04:54 IST2016-09-21T04:54:22+5:302016-09-21T04:54:22+5:30

भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जापान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

P. Kashyap in main round | पी. कश्यप मुख्य फेरीत

पी. कश्यप मुख्य फेरीत


टोकियो : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील फेरीतील सामना आपल्याच देशाच्या के. श्रीकांतविरुद्ध होणार आहे.
पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कश्यपला आॅस्ट्रियाच्या के. डेव्हिड ओबेरनोसटेररविरुद्ध खेळताना जास्त मेहनत नाही घ्यावी लागली. ११-३ गुणांनी कश्यप आघाडीवर असताना डेव्हिडने माघार घेतली. दुसऱ्या लढतीत चौथ्या मानांकित कश्यपने डेन्मार्कच्या अ‍ॅँडर्स एंटोनसेनला २१-१८, २१-१२ गुणंनी पराभूत करून मुख्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
महिलांच्या गटात भारताच्या तन्वी लाडला चुरशीच्या झालेल्या लढतीत जापानच्या चिसोतो होशीकडून २१-१९, ८१-२१, ९-२१ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांत व कश्यपच्या व्यतिरिक्त भारताचे एच.एस. प्रणय, अजय जयराम, बी. साई प्रणीत हे बुधवारी मुख्य फेरीत आपल्या अभियानाची सुरुवात करतील. (वृत्तसंस्था)
सहजपणे मुख्य फेरीत प्रवेश केल्यानंतर कश्यपपुढे आव्हान असेल ते भारताच्याच श्रीकांतचे. त्यामुळे या सामन्यात थरारक खेळ होणार हे निश्चित.

Web Title: P. Kashyap in main round