रोइंगपटू दत्तू भोकनल पदकाच्या शर्यतीतून बाहेर
By Admin | Updated: August 9, 2016 20:15 IST2016-08-09T20:04:25+5:302016-08-09T20:15:55+5:30
भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनलनं रिओ ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्याची संधी अवघ्या सहा सेकंदांनी गमावली

रोइंगपटू दत्तू भोकनल पदकाच्या शर्यतीतून बाहेर
ऑनलाइन लोकमत
रिओ दी जेनेरिओ, दि. 9 - भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनलनं रिओ ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्याची संधी अवघ्या सहा सेकंदांनी गमावली. उपांत्य फेरी गाठण्यासाठी दत्तूला उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या फेरीत तीनमध्ये स्थान मिळवणं गरजेचं होतं. दत्तूनं 6 मिनिटं आणि 59.89 सेकंदांची वेळ नोंदवली आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळं दत्तू पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. मात्र रोइंगमध्ये सात मिनिटांहून कमी वेळ नोंदवणारा दत्तू हा तिसरा भारतीय ठरला आहे. याआधी बजरंग लाल आणि स्वर्ण सिंग यांनी ही कामगिरी बजावली होती. दत्तूनं पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये 2 किलोमीटरचं अंतर 7 मिनिटं आणि 21.67 सेकंदांत पार करून तिसरं स्थान मिळवलं होतं.