आमची गाडी सहाव्या गियरमध्ये
By Admin | Updated: March 9, 2016 05:12 IST2016-03-09T05:12:15+5:302016-03-09T05:12:15+5:30
चांगली तयारी, जबरदस्त फॉर्म आणि मायदेशात खेळण्याची संधी यामुळे भारतीय संघ टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो

आमची गाडी सहाव्या गियरमध्ये
कोलकाता : चांगली तयारी, जबरदस्त फॉर्म आणि मायदेशात खेळण्याची संधी यामुळे भारतीय संघ टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो, या पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले की, आमची गाडी सध्या सहाव्या गियरमध्ये असली, तरी टष्ट्वेंटी-२0 प्रकारात एकदोन षटकांत सामन्याचे चित्र बदलू शकते, त्यामुळे सहकाऱ्यांनी परिस्थितीला गृहीत धरून ओव्हर कॉन्फिडंट राहू नये.
टष्ट्वेंटी-२0 प्रकारात भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, मला वाटते आमची गाडी सध्या सहाव्या गियरमध्ये आहे. सध्या संघाची घडी परफेक्ट बसली आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आमचे लक्ष्य स्पष्ट असले पाहिजे.
संघाची गाडी सध्या योग्य गतीने आणि योग्य दिशेने जात आहे. ही स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असे धरून चालणार नाही.(वृत्तसंस्था)
> फलंदाजीत क्रमात परिस्थितीनुरूप बदल करावे लागतात, त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर येतो; पण फिनिशरची भूमिका मला आवडते. फिनिशरला दहा-बारा चेंडू वाट्याला येतात, तेवढ्यातच डाव संपवणे हे त्याचे काम असते. जी संधी मिळते ती साधणे त्याचे काम असते.
ही उच्चस्तरीय स्पर्धा असल्याने प्रत्येक संघाची तयारी चांगली आहे, प्रत्येक संघाकडे एक असा खेळाडू आहे जो मोठे फटके मारू शकतो, एक अष्टपैलू गोलंदाज आहे.