शाहरुखसाठी वानखेडे स्टेडियमचे दार उघडले, एमसीएचा निर्णय
By Admin | Updated: August 2, 2015 13:51 IST2015-08-02T13:50:47+5:302015-08-02T13:51:25+5:30
सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरुख खानवर घातलेले निर्बंध रविवारी मागे घेण्यात आले.

शाहरुखसाठी वानखेडे स्टेडियमचे दार उघडले, एमसीएचा निर्णय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरुख खानवर घातलेले निर्बंध रविवारी मागे घेण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता शाहरुख खानला वानखेडेवर प्रवेश करता येणार आहे.
२०१२ मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळाला होता. या विजयानंतर शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः धिंगाणा घातला होता. शाहरुखने मैदानात उपस्थित असलेले एमसीएचे पदाधिका-यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच मैदानातील सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करत त्यांना शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुख खानवर पाच वर्षांची बंदी टाकली होती. यानुसार शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करता येत नव्हते. यामुळे आयपीएलच्या वानखेडेवरील सामन्यांमध्ये शाहरुखला संघासोबत हजेरी लावता येत नव्हती. ही बंदी २०१७ मध्ये संपणार होती.
शाहरुख खानवरील बंदी मागे घेण्यासंदर्भात रविवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत शाहरुखवरील बंदी मागे घेण्याचा प्रस्ताव आशिष शेलार यांनी मांडला व अखेरीस हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. आयपीएलमधील संघमालक व देशातील नागरिकावरच स्टेडियममध्ये बंदी घालणे अयोग्य असल्याचे मत आयपीएलच्या समितीनेही मांडले होते.