शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सबसे आगे होंगे हिंदुस्तानी...! आशियाई क्रीडा स्पर्धेची रंगतदार सुरुवात; चीनमध्ये खेळाडूंचा मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 20:32 IST

Asian Games Opening Ceremony : चीनमधील हांगझोऊ शहर पुढील काही दिवस क्रीडा विश्वाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ शहर पुढील काही दिवस क्रीडा विश्वाच्या केंद्रस्थानी असणार आहे. कारण येथील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली आहे. या उद्घाटन समारंभात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन यांनी भारताचे नेतृत्व केले. बहुचर्चित स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील उपस्थित होते. अशाप्रकारे खेळाडूंच्या मेळाव्यासह आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिकृतपणे सुरूवात झाली. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे ६५५ शिलेदार रिंगणात आहेत. ६५५ भारतीय खेळाडू ४० विविध खेळांमध्ये देशाचे प्रधिनिधित्व करतील. 

१२ हजारहून अधिक खेळाडूंचा सहभाग यापूर्वी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ५७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४५ देशांतील १२ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. खरं तर यापूर्वी २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेट हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग होता, परंतु बीसीसीआयने आपला संघ पाठवला नव्हता. मात्र, यावेळी बीसीसीआयने यावेळी आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवले आहेत.

दरम्यान, बांगलादेशच्या पुरुष क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धेत २०१० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर, महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर श्रीलंकेच्या पुरूष संघाला २०१४ मध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात यश आले. तर महिला गटात पाकिस्तानने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे यंदा क्रिकेटशिवाय कुस्ती, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमध्येही भारतीय चाहत्यांना सुवर्णपदकाची आशा असेल.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Indiaभारतchinaचीन