आयओसीला नमवून ओएनजीसी अजिंक्य
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
टष्ट्वेन्टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट : तन्मय श्रीवास्तवची नाबाद अर्धशतकी खेळी पुणे : टष्ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेडने (ओएनजीसी) तन्मय श्रीवास्तव (नाबाद ६८) व नीतेश राणा (४१) याच्या फलंदाजीच्या जोरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ ...
आयओसीला नमवून ओएनजीसी अजिंक्य
टष्ट्वेन्टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट : तन्मय श्रीवास्तवची नाबाद अर्धशतकी खेळी पुणे : टष्ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेडने (ओएनजीसी) तन्मय श्रीवास्तव (नाबाद ६८) व नीतेश राणा (४१) याच्या फलंदाजीच्या जोरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ इंडियाच्या (पीएसपीबी) सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पूना क्लब मैदानावर हा सामना झाला. आयओसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र ओएनजीसी संघाच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा देखील पार करता आला नाही. आदित्य तरे याने चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला येत ५२ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केल्याने संघाला शंभरी पार करता आली. रोहन राजे (१४) व मुर्तझा हुसेन याने नाबाद १३ धावांची खेळी केली. ओएनजीसीने आयओसीला २० षटकांत ८ बाद १२८ धावांवर संपुष्टात आला. प्रवीण कुमार याने ३, सुशैल शर्मा याने २ बळी घेत आयओसीची फलंदाजी मोडून काढली. ओएनजीसीने हे माफक आव्हान १७.१ षटकांत ४ बाद १३० धावा करीत पार केले. ओएनजीसीचा सालमीचा फलंदाज संदीप शर्मा भोपळाही न फोडता परतला. त्यानंतर सलामवीर तन्मय श्रीवास्तव (४८ चेंडूत ६८), नितेश राणा (३० चेंडूत ४१) यांनी भक्कम फलंदाजी करीत संघाचा विजय साकार केला. राजेश पवार, अमित दाणी, अब्बास अली, मुर्तझा हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. संक्षिप्त निकाल : आयओसी : २० षटकांत ८ बाद १२८ धावा, चेतेश्वर पुजारा ११, आदित्य तरे नाबाद ६२, रोहन राजे १४, मुर्तझा हुसेन नाबाद १३, प्रवीण कुमार ३/१०, सुशैल शर्मा २/३१, ओएनजीसी : १७.१ षटकांत ४ बाद १३० धावा, तन्मय श्रीवास्तव नाबाद ६८, नितेश राणा ४१, सुमित नरवाल नाबाद ७, अमित दाणी १/१३, राजेश पवार १/१६, मुर्तझा हुसेन १/२१, अब्बास अली १/२४. ------------टी मध्ये २० मार्च आयओसी : ओएनजीसीच्या प्रवीण कुमार याने आयओसीच्या फलंदाजाचा त्रिफळा उडविला टी मध्ये २० मार्च ओएनजीसी या नावाने विनिंग टीमचा फोटो आहे