खराडी संघाचा एकतर्फी विजय

By Admin | Updated: June 8, 2015 00:28 IST2015-06-08T00:28:08+5:302015-06-08T00:28:08+5:30

एस. व्ही. दामले चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या (४१ धावा व २ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर खराडी जिमखाना संघाने पीवायसी-बी संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडविला.

One-sided victory of Kharadi team | खराडी संघाचा एकतर्फी विजय

खराडी संघाचा एकतर्फी विजय

पुणे : एस. व्ही. दामले चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या (४१ धावा व २ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर खराडी जिमखाना संघाने पीवायसी-बी संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडविला. टष्ट्वेन्टी-टू यार्ड संघाने पीसीए संघाचा, तर स्टेडियम क्रिकेट क्लबने पीवायसी-ए संघाचा पराभव केला.
क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्यायासामन्यात खराडीने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत ६ बाद १६६ धावांचे भक्कम आव्हान उभारले. पारस गवळी (३२), हेमंत पवार (२१), धीरज फटांगरे (४१), अतुल विटकर (३१), मंजुनाथ मोक्की (२८) यांच्या खेळीने संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात आली. शुभंकर हर्डीकर याने १२ धावांत ४ बळी घेत खराडीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मात्र इतर गोलंदाज धोवा रोखण्यात अपयशी ठरले.
पीवायसी-बी संघाला खराडीने १७ षटकांत ८ बाद ७७ धावांतच रोखले. शुभंकर हर्डीकर याने फलंदाजीतही चमक दाखवत नाबाद २३ धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. अक्षय काळोखे याने ३, शुभम माळवदे व धीरज फटांगरे यांनी प्रत्येकी २ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अन्य एका सामन्यात ट्वेंटी-टू यार्ड संघाने गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर पीसीए संघाला ६ विकेट्सने धूळ चारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीसीए संघाला संघाला ६ बाद ११४ धावांवर रोखले. हार्दिक अदक, अजिंय चौगुले आणि जावेद अन्सारी यांनी अचूक माऱ्यासह प्रत्येकी एक बळी घेत पीसीएला मर्यादित धावसंख्येत रोखले. मिहिर डांगे (१८), प्रणव कुंभार (३२) आणी परिक्षित बांदक (२८) यांनी संघाला सावरले.
यानंतर धावांचा पाठलाग करताना ट्वेंटी टू यार्ड संघाने सहजपणे फटकेबाजी करताना केवळ ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष गाठताना विजयी कूच केली. निनाद चौगुले (४८) आणि मुकेश चौधरी (३०) यांनी दमदार फटकेबाजी करताना पीसीएच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी प्रण व मिहिर यांनी गोलंदाजीत देखील चमक दाखवताना प्रत्येकी एक बळी घेत ट्वेन्टी टू यार्डला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: One-sided victory of Kharadi team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.