ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाला दिले एक कोटी रुपये : क्रीडामंत्री

By Admin | Updated: August 5, 2016 20:50 IST2016-08-05T20:50:58+5:302016-08-05T20:50:58+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या गरजांबाबत सुरू असलेल्या चर्चा व अन्य मुद्यांची दखल घेताना ब्राझीलमधील भारतीय दूतावासाला एक कोटी रुपये

One crore rupees given to Indian embassy in Brazil: Sports Minister | ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाला दिले एक कोटी रुपये : क्रीडामंत्री

ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाला दिले एक कोटी रुपये : क्रीडामंत्री

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या गरजांबाबत सुरू असलेल्या चर्चा व अन्य मुद्यांची दखल घेताना ब्राझीलमधील भारतीय दूतावासाला एक कोटी रुपये पाठविण्यात आल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले. या निधीतून भारतीय पथकाला आवश्यक असलेल्या बाबींची तरतूद करता येईल.
क्रीडा मंत्री गोयल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, भारताचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे पथक या स्पर्धेत सहभागी होत आहे. आमचे १०१ खेळाडू यापूर्वीच क्रीडाग्राममध्ये दाखल झाले असून उर्वरित खेळाडू नियोजित वेळी रिओत दाखल होतील.

आॅलिम्पिक इतिहासात प्रथम भारत सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांच्या विनंतीचा स्वीकार करीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.
यामुळे भारतीय खेळाडूंना घरी असल्यासारखे वाटेल आणि चांगली कामगिरी करतायेईल.

गोयल यांनी अलीकडेच घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करताना सांगितले की,ह्यहॉकी संघाने टीव्ही व अतिरिक्त फर्निचरबाबत (खुर्ची व टेबल) म्हटले होते. अशा बाबी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रिओ आॅलिम्पिक आयोजन
समितीची आहे. त्यांनी खुर्च्यांच्या स्थानी बीन बॅग उपलब्ध करून दिले. आम्ही ब्राझीलमध्ये असलेल्या दूतावासाकडे एक कोटी रुपये पाठविले असून त्यात भारतीय पथकाला आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करता येईल.

काही हॉकीपटूंच्या जर्सीच्या आकाराच्या मुद्यावर बोलताना गोयल म्हणाले, हे प्रकरण आयओए आणि हॉकी इंडिया यांनी सोडवले आहे. टेनिसपटू लिएंडर पेस व रोहण बोपन्ना यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट करीत क्रीडा मंत्री म्हणाले, या दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. टेनिसचा ड्रॉ कठीण आहे, पण आमचा खेळाडूंवर विश्वास आहे.
उद््घाटन समारंभात काही महिला खेळाडू साडीवर ब्लेझर घालणार नसल्याचे वृत्ताबाबत बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले,ह्यआयओएला उद््घाटन समारंभासाठी आयओसीच्या नियमाचे पालन करावे लागेल.

गोयल पुढे म्हणाले,ह्यमाझे अधिकारी खेळाडूंच्या अडचणी समजून घेण्यासाठी रिओ आणि दिल्लीमध्ये कुठल्याही क्षणी उपलब्ध राहतील. ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही अडचणी आमचे अधिकारी आयओए, फेडरेशन आणि रिओ आॅलिम्पिक आयोजन समितीसोबत मिळून सोडवित आहेत. सरकारने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांना आॅलिम्पिकसोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यात युवा पिढी आॅलिम्पिक खेळाकडे आकर्षित होण्यास मदत मिळेल.

Web Title: One crore rupees given to Indian embassy in Brazil: Sports Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.