भारताकडून ओमानचा धुव्वा

By Admin | Updated: September 24, 2014 04:08 IST2014-09-24T04:08:55+5:302014-09-24T04:08:55+5:30

रूपिंदर पाल सिंह आणि व्ही़आर. रघुनाथ (प्रत्येकी २ गोल) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर ‘ब’ गटाच्या हॉकी लढतीत भारतीय पुरुष संघाने ओमानचा ७-०ने धुव्वा उडविला़

Oman flame from India | भारताकडून ओमानचा धुव्वा

भारताकडून ओमानचा धुव्वा

इंचियोन : रूपिंदर पाल सिंह आणि व्ही़आर. रघुनाथ (प्रत्येकी २ गोल) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर ‘ब’ गटाच्या हॉकी लढतीत भारतीय पुरुष संघाने ओमानचा ७-०ने धुव्वा उडविला़
भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल नोंदविता आला नाही; भारताकडून रूपिंदर पाल सिंह याने गोलचे खाते उघडले. त्याने सामन्याच्या १८व्या मिनिटाला पहिला गोल केला़ त्यानंतर १९व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून संघाला २-०ने आघाडी मिळवून दिली़ सामन्याच्या ३३व्या मिनिटाला भारताच्या आकाशदीप सिंह याने आणखी एक गोल नोंदवून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली़ व्ही. रघुनाथ याने ३९व्या मिनिटाला गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी केली़ रमनदीप सिंह याने ५४व्या मिनिटाला भारतातर्फे ५वा गोल नोंदविला, तर ६०व्या मिनिटाला दानिज मुज्तबा याने मैदानी गोल करताना स्कोअर ६-० असा केला, तर रघुनाथ याने आपला दुसरा गोल नोंदवीत संघाला ७-० असा विजय मिळवून दिला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Oman flame from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.