मुंबई हॉकी निवडणुकीत ऑलिम्पियन पराभूत

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:36+5:302015-08-12T23:54:36+5:30

मुंबई: ऑलिम्पियन गुरबख्श सिंग ग्रेवाल, मर्वन फर्नांडिस आणि जोकिम कार्वाल्हो यांना मुंबई हॉकी संघटनेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर मंगा सिंग बख्शी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने सर्व पदांवर विजय नोंदवला़ काही व्यावसायिकांच्या विरोधात क्रीडा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार्‍या खेळाडूंच्या गटाला जादा मतेही पडली नाहीत़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९६८ मेक्सिको ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार्‍या गुरबख्श सिंग यांना केवळ ६६ मते मिळाली तर बख्शी यांनी २४८ मते मिळवत विजय नोंदवला़ तीन वेळचा ऑलिम्पियन फर्नांडिस यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ ७० मते पडली़ खेळाडूंच्या गटातील अन्य एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सतिंदर वालिया यांनादेखील ६३ मते मिळाली़ या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले़ मलकीत सिंग, गुरदीप सिंग

Olympics lose in Mumbai hockey elections | मुंबई हॉकी निवडणुकीत ऑलिम्पियन पराभूत

मुंबई हॉकी निवडणुकीत ऑलिम्पियन पराभूत

ंबई: ऑलिम्पियन गुरबख्श सिंग ग्रेवाल, मर्वन फर्नांडिस आणि जोकिम कार्वाल्हो यांना मुंबई हॉकी संघटनेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर मंगा सिंग बख्शी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने सर्व पदांवर विजय नोंदवला़ काही व्यावसायिकांच्या विरोधात क्रीडा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार्‍या खेळाडूंच्या गटाला जादा मतेही पडली नाहीत़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९६८ मेक्सिको ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार्‍या गुरबख्श सिंग यांना केवळ ६६ मते मिळाली तर बख्शी यांनी २४८ मते मिळवत विजय नोंदवला़ तीन वेळचा ऑलिम्पियन फर्नांडिस यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ ७० मते पडली़ खेळाडूंच्या गटातील अन्य एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सतिंदर वालिया यांनादेखील ६३ मते मिळाली़ या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले़ मलकीत सिंग, गुरदीप सिंग चंडोक उपाध्यक्ष बनले़ त्यांना अनुक्र मे २३५, २१७ मते मिळाली़ सचिवपदाच्या स्पर्धेतील कार्वाल्हो यांना केवळ ८३ मते मिळाली़ राम सिंग राठोड २२९ मतांसह पुनश्च हे पद प्राप्त करण्यात यशस्वी झाले़ सत्ताधारी गटाकडून केवळ दोन माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू निवडणूक लढवत होते़ यात मीररंजन नेगी (२५७ मते), डेरिल डिसूझा (२४० मते) यांचा समावेश होता़ नवी समिती २०१८ पर्यंत कार्यभार सांभाळणार आहे़

Web Title: Olympics lose in Mumbai hockey elections