निलंबनानंतरही रशियाने मागितली आॅलिम्पिक परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 20:38 IST2016-07-05T20:38:50+5:302016-07-05T20:38:50+5:30
मॉस्को डोपिंगप्रकरणी रशियाच्या ट्रॅक अॅन्ड फिल्ड संघाला निलंबित केल्यानंतरही रशियाच्या अॅथ्लेटिक्स महासंघाने ६६ खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे

निलंबनानंतरही रशियाने मागितली आॅलिम्पिक परवानगी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ : मॉस्को डोपिंगप्रकरणी रशियाच्या ट्रॅक अॅन्ड फिल्ड संघाला निलंबित केल्यानंतरही रशियाच्या अॅथ्लेटिक्स महासंघाने ६६ खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे. या ६६ अॅथ्लिटकडे नियमांची पूर्तता करण्याविषयीचे पत्र आहे. या खेळाडूंना रशियाच्या कोचेसने देखील परवानगी बहाल केली. गेल्या महिन्यात रशियाच्या अॅथ्लेटिक्स महासंघावर आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटिक्स महासंघाने डोपिंगप्रकरणी बंदी कायम ठेवली होती. पण जे खेळाडू डोपिंगेपासून दूर आहेत अशा खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये तटस्थ खेळाडू म्हणून परवानगी बहाल केली. यावर रशियाच्या अॅॅथ्लेटिक्स महासंघाचे मत असे की आमच्या प्रत्येक खेळाडूने रिओमध्ये सहभागी होण्यासाठी आयएएएफकडे वैयक्तिक विनंती केली आहे.ह्ण आयओसीच्या नियमानुसार जे खेळाडू आयएएएफतर्फे वैयक्तिक परीक्षणात उत्तीर्ण होतील ते खेळाडू स्वत:च्या देशाच्या ध्वजाखाली आॅलिम्पिकमध्ये
सहभागी होऊ शकतात.