२०२८ च्या आॅलिम्पिकचा आॅस्ट्रेलिया दावेदार

By Admin | Updated: April 30, 2015 01:35 IST2015-04-30T01:35:29+5:302015-04-30T01:35:29+5:30

२०२८ च्या आॅलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याचा दावा करणारा आॅस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आॅलिम्पिक आयोजन करण्यास सक्षम असल्याचे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी म्हटले आहे.

Olympic contenders of the 2028 Olympics | २०२८ च्या आॅलिम्पिकचा आॅस्ट्रेलिया दावेदार

२०२८ च्या आॅलिम्पिकचा आॅस्ट्रेलिया दावेदार

सिडनी : २०२८ च्या आॅलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याचा दावा करणारा आॅस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आॅलिम्पिक आयोजन करण्यास सक्षम असल्याचे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी म्हटले आहे.
आॅस्ट्रेलिया आॅलिम्पिक समितीने २०२८ च्या आॅलिम्पिक यजमानपदासाठी दावेदारी सादर केली. यावर बाक म्हणाले,‘ याविषयी मी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट यांची भेट घेतली. १९५६ चे मेलबोर्न आणि २००० च्या सिडनी आॅलिम्पिकच्या यशानंतर भविष्यात या खेळाचे आयोजन करण्यास आॅस्ट्रेलिया अन्य दावेदारांच्या तुलनेत सक्षम देश आहे.’ आॅस्ट्रेलियाच्या दावेदारीचे मोठ्या प्रमाणावर समर्थन होत असून या देशाला यजमानपद मिळण्याची अधिक शक्यता आहे. आॅस्ट्रेलियाने २०२८ साठी दावा केला असला तरी भविष्यात अन्य देशांकडून त्यांना आव्हान मिळू शकते असे मी एबोट यांचेशी चर्चा करतेवेळी सांगितले आहे.’ पुढील वर्षी ब्राझिलमध्ये रियो आॅलिम्पिकचे आयोजन होत आहे. जपानच्या टोकियो शहरात २०२० आॅलिम्पिकचे आयोजन होईल. टोकियो दुसऱ्यांदा आॅलिम्पिकसाठी सज्ज होत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Olympic contenders of the 2028 Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.