ओकाबरेजा डबल धमाका, दुसरे सुवर्ण जिंकले
By Admin | Updated: August 2, 2014 00:09 IST2014-08-02T00:09:57+5:302014-08-02T00:09:57+5:30
नायजेरियाच्या ब्लेसिंग ओकागबरेने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम कमांक जिंकून २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले दुसरे सुवर्ण जिंकून डबल धमाका केला.

ओकाबरेजा डबल धमाका, दुसरे सुवर्ण जिंकले
ग्लास्गो : नायजेरियाच्या ब्लेसिंग ओकागबरेने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम कमांक जिंकून २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले दुसरे सुवर्ण जिंकून डबल धमाका केला.
वेगवान धावपटूचा मान संपादन करणाऱ्या २५ वर्षीय ओकागबरेने २०० मीटर धावण्याची शर्यत जिंकताना २२.२५ सेकंदांची वेळ नोंदविली. सोमवारी तिने १०० मीटर धावण्याची शर्यत १०.८५ सेकंदांत पूर्ण करून जिंकली होती. या स्पर्धेत ओकागबरेला तिसरे सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. ती महिलांच्या चार बाय चारशे मीटर रिलेमध्येसुद्धा सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)