अरेच्चा...ज्युनियर तेंडुलकरचा जुळा भाऊ हॉलिवूडमध्ये ?
By Admin | Updated: September 30, 2016 14:29 IST2016-09-30T14:15:30+5:302016-09-30T14:29:06+5:30
जगामध्ये एकसारखे दिसणारे सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दोन सख्खे भाऊ कुंभ मेळ्यात वेगळे होतात आणि

अरेच्चा...ज्युनियर तेंडुलकरचा जुळा भाऊ हॉलिवूडमध्ये ?
सागर सिरसाट/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -जगामध्ये एकसारखे दिसणारे सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दोन सख्खे भाऊ कुंभ मेळ्यात वेगळे होतात आणि मोठे झाल्यावर जुळे बनतात हे तुम्ही पाहिलं असेल. मात्र, इंटरनेटवर नेटीझन्स कोणा-कोणाला जुळं ठरवतील याचा काही नेम नाही.
जेव्हा अशा घटना चर्चेतील व्यक्तिंबाबत घडतात तेव्हा जास्तच खास बनतात. सध्या नेटीझन्सनी भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबरला जुळं ठरवलं आहे.
.jpg)
ज्युनियर तेंडुलकरने आपला 17 वा जन्मदिवस 24 सप्टेंबरला साजरा केला, यावेळी एक फेसबुक पेज क्रिकेट ऑफ सर्कलने अर्जुनला शुभेच्छा देत सचिन आणि अर्जुनचा एक फोटो ट्वीट केला. त्यानंतर हा फोटो व्हायरल व्हायला सुरूवात झाली आणि नेटीझन्सना अर्जुन जस्टीन बीबरसारखा दिसायला लागला.
@justinbieber I'm totally confused were you in this photo ? #JustinBieber#Arjunpic.twitter.com/c23fBAp5IK
— Nandan (@GOKUL_NANDAN) September 28, 2016
नेटीझन्सनी अर्जुनच्या हेयरस्टाइलपासून चालण्याच्या पद्धतीपर्यंत अर्जुन आणि बीबरमध्ये साम्य शोधलं. इतक्यावरच न थांबता काहींनी तर त्याला इंडियन जस्टीन बीबर असंही म्हटलं.
OMG!!