सुवर्णपदक आईवडील व सरांना अर्पण : किशोरी शिंदे

By Admin | Updated: October 4, 2014 01:50 IST2014-10-04T01:50:44+5:302014-10-04T01:50:44+5:30

‘आशियाई कबड्डी स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक वडील दिलीप शिंदे, आई विजया, आमचे सर राजेंद्र ढमढेरे यांना अर्पण करते. माङया 11 वर्षाच्या तपश्चर्यचे फळ मला मिळाले,’

Offering gold medal to parents and heads: Kishori Shinde | सुवर्णपदक आईवडील व सरांना अर्पण : किशोरी शिंदे

सुवर्णपदक आईवडील व सरांना अर्पण : किशोरी शिंदे

>शिवाजी गोरे - पुणो
‘आशियाई कबड्डी स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक वडील दिलीप शिंदे, आई विजया, आमचे सर राजेंद्र ढमढेरे यांना अर्पण करते. माङया 11 वर्षाच्या तपश्चर्यचे फळ मला मिळाले,’ असे भारतीय संघाची मध्यरक्षक खेळाडू किशोरी शिंदेने ‘लोकमत’ला सांगितले. 
इंचियोन येथे आज झालेल्या महिलांच्या कबड्डी अंतिम लढतीत इराणचा पराभव केल्यानंतर, किशोरी शिंदेला संपर्क साधला असता - तिने ‘लोकमत’च्या शुभेच्छांचा स्वीकार केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आनंदात असलेली किशोरी म्हणाली,  ‘आजचा दिवस माङयासाठी खूप महत्त्वाचा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकायचे, हे स्वप्न मी पाहिले होते, ते आज पूर्ण झाले. मी एशियन बीच कबड्डीमध्ये मारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, आजचे सुवर्णपदक हे माङयासाठी खूप महत्त्वाचे आहे. माङो आईवडील, सर, आमच्या राजमाता जिजाऊ संघातील माङया प्रत्येक सहकारी खेळाडूंचा आणि महत्त्वाचे म्हणजे, शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूलचे पदाधिकारी व शिक्षक या सर्वाचा यात महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यापूर्वी माङया पायाच्या स्नायूचे ऑपरेशन झाले होते. तेव्हा  माङयावर वैद्यकीय उपचार करून, माङयात पुन्हा जिद्द निर्माण करणारे बलराज वाडेकर आणि जयवंत वारघडे यांनासुद्धा मी विसरू शकत नाही. त्यांनी ऑपरेशननंतर माझी काळजी घेतली, त्यामुळे यावर्षी मी भारतीय संघात खेळू शकले. त्यामुळे या सर्वाना आजच्या ‘सुवर्णपदका’चे श्रेय जाते.’  आजच्या लढतीविषयी बोलताना किशोरी म्हणाली, की आम्ही हा सामना जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलो होतो. संघाच्या मार्गदर्शकांनी जी रणनीती आखली होती त्यानुसार कर्णधार तेजस्विनी, अभिलाषा आणि ममता यांचा खेळ ठरलेल्या नियोजनाप्रमाणो होत होता. आम्ही जास्त भर तंत्रवर (टेक्निक) दिला होता. त्यामुळे सुवर्णपदक आपल्याकडेच येणार, असा विश्वास होता.     
 
किशोरीच्या जिद्दीला सलाम : राजेंद्र ढमढेरे 
भारतीय सराव शिबिराच्या आधी मांडीच्या स्नायूचे ऑपरेशन झाले होते. त्यातून तिने जिद्दीने; तसेच मानसिकता कोठेही ढळू न देता पुन्हा मैदानावर येऊन सराव केला आणि भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. त्या काळात तिने जे कष्ट घेत उभारी घेतली, ते पाहता तिला मी सलाम करतो, असे किशोरीचे मार्गदर्शक राजेंद्र ढमढेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
ढमढेरे म्हणाले, की किशोरीचे आज स्वप्न पूर्ण झाले. इराणच्या खेळाडूंच्या तिने केलेल्या पकडी अफलातून होत्या. ती ज्या  उजव्या-पाचव्या मध्यरक्षक जागी खेळते तिथे तिची मोठी जबाबदारी असते. काही खेळाडू उजव्या, तर काही डाव्या बाजूने आक्रमण करतात. त्यामुळे तिला दोन्ही बाजूने सतर्क राहावे लागते. या स्पर्धेतील तिचा एकूण खेळ चांगला झाला. तिने तिच्या निवडीचे सार्थक केले. 
कबड्डीमध्ये आमच्या राजमाता जिजाऊ संघाने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धामध्ये विजेतेपद जिंकून सर्व अडथळे दूर केले होते. फक्त हीच एक इच्छा पूर्ण होण्याची राहिली होती, तीसुद्धा आज किशोरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पूर्ण केली. 

Web Title: Offering gold medal to parents and heads: Kishori Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.