शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ओदिशा सरकारचं मोठं पाऊल; आधी भारतीय हॉकीला नवसंजीवनी दिली अन् आता प्रत्येक खेळाडूला २.५० कोटींचे बक्षीस! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:49 IST

भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली.

भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. २०१८मध्ये जेव्हा सहारानं भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व संपुष्टात आणले तेव्हा ओदिशा सरकार पुढे आली. ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला आणि ज्युनियर, सीनियर, पुरुष व महिला राष्ट्रीय संघासाठी १५० कोटींचा करार केला. २०२३पर्यंत हा करार आहे आणि याशिवाय ओदिशा सरकार वर्ल्ड क्लास ट्रेनिंग, रिहॅब फॅसिलिटी, प्रॅक्टिस पिचच्या माध्यमातून भारतीय हॉकीला संजीवनी दिली. त्याचेच फळ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले. भारतीय पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. तर महिला संघानं चौथ्या स्थानापर्यंत मजल मारून इतिहास घडवला. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद,  १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत. 

ओदिशा सरकारचा पुढाकार! २०१३पासून ओदिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला. त्यामुळेच हॉकी संघाच्या यशानंतर ओदिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले जात आहे.

भारताच्या पदक विजेत्या पुरुष हॉकी संघातील राज्याच्या खेळाडूला प्रत्येकी २.५ कोटी अन् महिलांना ५० लाख देण्याची घोषणा ओदिशा सरकारनं केली आहे. शिवाय अमित रोहिदास व बीरेंद्र लाक्रा यांची ओदिशा पोलिस DSP म्हणून नियुक्ती केली आहे. ( Odisha announces awards to its #hockey stars of #Olympics. Rs 2.5cr each for men and Rs 50 lakh each for women. Plus appointment as DSP with Odisha Police for men (Amit Rohidas & Birendra Lakra). )    

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HockeyहॉकीOdishaओदिशा