नंबर वन कसोटी संघाला १० लाख डॉलर

By Admin | Updated: October 14, 2015 00:04 IST2015-10-14T00:04:48+5:302015-10-14T00:04:48+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अव्वल कसोटी संघाला देण्यात येणारी बक्षीस रक्कम दहा लाख डॉलर इतकी केली आहे. आधी ही रक्कम पाच लाख डॉलर होती.

Number One Test Team $ 10 Million | नंबर वन कसोटी संघाला १० लाख डॉलर

नंबर वन कसोटी संघाला १० लाख डॉलर

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अव्वल कसोटी संघाला देण्यात येणारी बक्षीस रक्कम दहा लाख डॉलर इतकी केली आहे. आधी ही रक्कम पाच लाख डॉलर होती. १ एप्रिल २०१६ पासून बक्षिसाची रक्कम दुप्पट होईल. याशिवाय महिला क्रिकेटमधील गुंतवणूक पाचपट वाढविण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत खेळाडूंना बक्षिसापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत ४१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यानुसार १ एप्रिल २०१६ रोजी अव्वल स्थानावर असलेल्या कसोटी संंघास दहा लाख डॉलर मिळतील. आयसीसीच्या असोसिएट्स आणि अ‍ॅफिलिएट सदस्य देशांना मिळणाऱ्या रकमेत २० कोटी ८० लाख डॉलर अशी वाढ करण्यात आली आहे.
आयसीसीद्वारे १९ वर्षे गटाचा पुढील विश्वचषक बांगलादेशात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने पंचांचे कौतुक करताना २०१५ च्या विश्वचषकानंतर सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यात योग्य निर्णय देण्यासाठी पाठ थोपटली आहे. शिवाय संशयास्पद शैलीच्या मुद्यावर केलेल्या कामाचेदेखील समर्थन केले.
२०१६ ते २०२३ या कालावधीत आयोजित होणाऱ्या आयसीसीच्या सहा महिला स्पर्धांसाठी लागणाऱ्या निधीत पाचपटीने वाढ करण्यात आली. इंग्लंडमध्ये आयोजित २०१७ च्या महिला विश्वचषक विजेत्या संघाला दहा लाख डॉलर बक्षीस असेल. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाईल. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आयसीसी महिला चॅम्पियनशिपची दुसरी स्पर्धा २०१७ च्या स्पर्धेनंतर होईल.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणातील मर्यादेशी जुळलेले दोन नियम वगळता अन्य सर्व नियम महिलांसाठी देखील लागू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Number One Test Team $ 10 Million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.