शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

आता भेट काठमांडूत

By admin | Updated: February 17, 2016 02:39 IST

यजमान भारताची विक्रमी कामगिरी... नयनरम्य आतषबाजी... डोळे दीपवणारा लेझर शो आणि त्याला संगीताची मिळालेली जोड

शिलाँग : यजमान भारताची विक्रमी कामगिरी... नयनरम्य आतषबाजी... डोळे दीपवणारा लेझर शो आणि त्याला संगीताची मिळालेली जोड... अशा एक ना अनेक संस्मरणीय आठवणींसह मंगळवारी १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. केंद्रीय क्रीडामंत्री व सॅग स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष सर्बानंद सोनोवाल यांनी गर्दीने फुललेल्या इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियममध्ये स्पर्धेच्या समारोपाची घोषणा केली. समारोप समारंभाला आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, आसाम व मेघालयाचे क्रीडामंत्री, पुढील सॅग स्पर्धेचे यजमान नेपाळ व बांगलादेशचे क्रीडामंत्री, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि महासचिव राजीव मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. समारोप समारंभात खेळाडूंनी २०१९ मध्ये नेपाळमधील काठमांडूमध्ये होणाऱ्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा भेटण्याचा निर्धार करीत स्पर्धेचा निरोप घेतला. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई म्हणाले,‘‘ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. याचे सर्व श्रेय दोन्ही राज्य आसाम व मेघालय येथील अधिकारी व नागरिकांना जाते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी व अधिकाऱ्यांनी आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्यातर्फे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काही त्रुटी आढळल्या असतील, तर त्यासाठी क्षमा मागतो. १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेची ज्योत समारोपाची घोषणा झाल्यानंतर विझविण्यात आली. त्यानंतर स्टेडियमचा आसमंत आतषबाजीने उजळून निघाला. त्यानंतर आगामी स्पर्धेचे यमजान असलेल्या नेपाळने आपला छोटेखानी कार्यक्रम सादर केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मोहित केले. (वृत्तसंस्था)