शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सध्या तरी डोक्यात खेळच; निवृत्ती नाही!, विश्वनाथन आनंदचा पुन्हा निवृत्तीला ‘फुलस्टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 1:34 AM

बुद्धिबळावर अधिराज्य गाजवणारा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद सध्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चेस आॅलिम्पियाडच्या तयारीला लागला आहे.

सचिन कोरडपणजी : बुद्धिबळावर अधिराज्य गाजवणारा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद सध्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चेस आॅलिम्पियाडच्या तयारीला लागला आहे. या वर्षी तो विश्व चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली. याला मात्र आनंदने पुन्हा ‘फुलस्टॉप’ दिला.पन्नाशीत पोहोचलेला आनंद म्हणाला, माझ्या डोक्यात सध्या तरी खेळच आहे. निवृत्तीचा विचारही नाही. मी विश्व रॅपिड आणि चेस आॅलिम्पियाडचीतयारी करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे, आनंदने वय वाढले तरी खेळातील उंची वाढत असल्याचे सांगितले.पोकर स्पोटर््स लीगचे (पीएसएल) दुसरे सत्र गोव्यात झाले. या स्पर्धेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून आनंद गोव्यात आला होता. त्या वेळी त्याने ‘लोकमत’ला मुलाखत दिली. प्रत्येक चाल सराईतपणे चालावी तशीच सफाईदार उत्तरे आनंदने दिली.विश्व चॅम्पियन स्पर्धेच्या पात्रतेसाठीच्या कॅँडिडेटमध्ये तू अपयशी ठरलास. तुझी कितपत निराशा झाली?असे विचारल्यावर आनंद म्हणाला, हा खेळाचाच एक भाग आहे. थोडी निराशा झाली; पण मी पाच वेळा ही स्पर्धा जिंकलीय. निवृत्तीची चर्चा रंगत असली, तरी माझे लक्ष खेळावरच आहे.तुझे पुढील ध्येय कोणते?आनंद- माझ्या डोळ्यापुढे दोन मोठ्या स्पर्धा आहेत. त्यात विश्व रॅपिड आणि चेस आॅलिम्पियाड. सप्टेंबरमध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा होत आहे. २००६ नंतर प्रथमच मी या स्पर्धेत पुनरागमन करीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी ती खास असेल.तू विश्व रॅपिड स्पर्धा जिंकलीस. पारंपरिक प्रतिस्पर्धी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धचा सामनातू जिंकलास. जिंकल्यानंतर मनात काय चाललं होतं?आनंद- मनात... ओ.. मन आणि डोकं हलकं वाटत होतं. व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. खूप प्रतीक्षेनंतर यश मिळाले तर आनंद खूप वेगळाच असतो. तसंच माझ्याबाबतही झालं.रशिया, युक्रेनसारखे कमी लोकसंख्येचे देश बुद्धिबळात प्रगतिपथावर आहेत. याचे कारण कोणते? आपण का मागे पडतोय?आनंद- लोकसंख्या हा फॅक्टर विचारात नसावा. रशिया, युक्रेन, नॉर्वे तसेच युरोपमधील देशांमध्ये चेस संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजली आहे. सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत. भारतात तशी संस्कृती निर्माण व्हायची आहे. पण, आज भारतातही दर्जेदार खेळाडू घडत आहेत. मला बुद्धिबळातही चांगले भविष्य दिसतेय.बुद्धिबळ इतर खेळांप्रमाणे प्रत्येक शाळेत पोहचला नाहीए? त्याबद्दल काय वाटते?आनंद- काही राज्यांनी या खेळासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी बुद्धिबळाचा समावेश अभ्यासक्रमातही केलेला आहे. त्यात गोव्यातील काही शाळांचा समावेश आहे. असा पुढाकार इतर राज्यांनीसुद्धा घ्यायला हवा. मीवैयक्तिक पातळीवर काही प्रयत्नही केले आहेत. आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यास दृष्टिकोनही बदलेल.