आता मी परिपक्व: दीपिकाकुमारी
By Admin | Updated: August 4, 2015 22:48 IST2015-08-04T22:48:11+5:302015-08-04T22:48:11+5:30
रियो आॅलिम्पिकसाठी वैयक्तिक आणि सांघिक कोटा मिळविणाऱ्या झारखंडच्या दीपिकाकुमारीने आपण लंडन आॅलिम्पिकसाठी सज्ज असून,

आता मी परिपक्व: दीपिकाकुमारी
नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिकसाठी वैयक्तिक आणि सांघिक कोटा मिळविणाऱ्या झारखंडच्या दीपिकाकुमारीने आपण लंडन आॅलिम्पिकसाठी सज्ज असून, अनुभवाच्या बाबतीत आता परिपक्व झाले असल्याचे म्हटले आहे.
डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिरंगा फडकावून मायदेशी परतलेल्या भारतीय संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना दीपिका बोलत होती. भारतीय तिरंदाजी संघाचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांच्या निवासस्थानी मंगळवारी हा सोहळा झाला. समारंभात केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते. जागतिक स्पर्धेत दीपिकाकुमारी, रिमिल बुरुली आणि लक्ष्मीराणी मांझी या तिघींनी महिला रिकर्व्ह स्पर्धा प्रकारात रौप्यपदक पटकावून वैयक्तिक आणि सांघिक आॅलिम्पिक कोटा प्राप्त केला होता. (वृत्तसंस्था)