आता लक्ष्य ऑलिम्पिकच्या पात्रतेचे !
By Admin | Updated: August 6, 2014 01:20 IST2014-08-06T01:20:54+5:302014-08-06T01:20:54+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.

आता लक्ष्य ऑलिम्पिकच्या पात्रतेचे !
पुणो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. आता आम्ही 2क्16मध्ये रिओ दि जानेरो येथे होणा:या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया ओम्कार ओतारी व गणोश माळी यांनी दिली.
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत ओम्कार व गणोश या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्यपदके जिंकून दिली. ओम्कारने 69 किलो, तर गणोशने 56 किलो वजन गटामध्ये ही कामगिरी केली. रविवारी (दि. 3) रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर या दोघांचीही आज बाणोर रोडपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ढोल-ताशे आणि डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ‘‘येत्या नोव्हेंबर महिन्यात कझाकिस्तानमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीची स्पर्धा होत आहे. यात चांगली कामगिरी करून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत. यापुढेही वेटलिफ्टिंग प्रकारात देशासाठी अधिकाधिक पदके जिंकू,’’ असा निर्धार दोघांनीही मिरवणुकीनंतर ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केला.
ओम्कार आणि गणोश हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावचे रहिवासी. हे दोघेही तेथील द हरक्युलस जिमचे खेळाडू. विशेष म्हणजे दोघांचे प्रशिक्षकही एकच. प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणोमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकल्याची भावना ओम्कार व गणोश यांनी व्यक्त केली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून देणारा चंद्रकांत माळी हादेखील या दोघांचा गाववाला आणि गुरुबंधूदेखील आहे. मिरवणुकीनंतर क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला.
27वर्षीय ओम्कार हा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रबोधिनीमध्ये वेटलिफ्टिंगचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2क्1क्च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ओम्कार खेळला होता. मात्र, त्यात त्याला पदक जिंकता आले नव्हते. ‘‘2क्11मध्ये माङया आईचे निधन झाले. 2क्1क्च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हुकलेले पदक जिंकून दाखवण्याचे वचन तिने माङयाकडून घेतले होते. वारंवार दुखापती होऊनही केवळ अन् केवळ तिच्या प्रेरणोमुळेच मी इथवर पोहोचू शकलो. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान माङया पाठीला दुखापत झाली होती. त्याचा त्रस होऊ नये म्हणून मी प्रतिस्पध्र्याच्या क्षमतेचा अभ्यास करून आवश्यक तेवढेच वजन उचलले. मात्र, तरीही मला त्रस झालाच. खेळात हे चालायचेच. माङया यशाने प्रबोधिनीतील मुले खूश आहेत. त्यांच्यातील अनेकांनी माझी कामगिरी मागे टाकणारे यश मिळवावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी भावनाही ओम्कारने व्यक्त केली.
लाज:या स्वभावाच्या 21वर्षीय गणोशची वरिष्ठ स्तरावरील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात कांस्यपदक जिंकून त्याने आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. गणोश म्हणाला, ‘‘आमच्या कुटुंबातील अनेक जण जिममध्ये जात. मीदेखील त्यांचे अनुकरण केले. नंतर याची गोडी लागली. प्रदीप पाटील सरांनी मला मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके जिंकण्याचे स्वप्न दाखवले व त्याच्या पूर्ततेसाठी माङयाकडून मेहनतही करून घेतली.’’ (क्रीडा प्रतिनिधी)
मिरवणूक विजयवीरांची : ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदके जिंकणा:या ओम्कार ओतारी व गणोश माळी यांची सोमवारी (दि. 4) सायंकाळी बाणोर रस्त्यापासून म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलार्पयत ढोल-ताशे व डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या विजयवीरांचे कौतुक करण्यासाठी की काय पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसातही डीजेच्या तालावर जल्लोषात नाचताना शिवछत्रपती क्रीडा संकुलातील प्रबोधिनीचे खेळाडू. डावीकडे मिरवणुकीदरम्यान (डावीकडून) गणोश आणि ओम्कार.